एक्स्प्लोर

Puneeth Rajkumar Death:कन्नड अभिनेते पुनित राजकुमार यांचं निधन

Puneeth Rajkumar Death: 46 वर्षीय कन्नड अभिनेते पुनित राजकुमार यांचं निधन झालं आहे. 

Puneeth Rajkumar Passes away : 46 वर्षीय कन्नड सुपरस्टार पुनित राजकुमार यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद आणि बॉलिवूड अभिनेता सोनू सोद यांनी पुनित राजकुमार यांच्या निधनाच्या वृत्ताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुनित राजकुमार यांना छातीत दुखत असल्यामुळे बंगळुरुतील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुनीत राजकुमार यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर सतत देखरेख ठेवून होती. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. टॉलिवूडपासून बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातूनही श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पुनीत राजकुमार यांच्या निधनानं टॉलिवूडमध्ये मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस. बोम्मई यांनी पुनीत राजकुमार यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विक्रम हॉस्पिटल गाठलं होतं.

अभिनेता पुनीत राजकुमार यांना सकाळी 11.30 वाजता छातीत दुखू लागल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टारांनी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. पुनित राजकुमार यांना चाहते प्रेमाने अप्पु म्हणत. पुनित दिग्गज अभिनेते राजकुमार आणि Parvathamma यांचा मुलगा होय. पुनित राजकुमार यांनी 29 पेक्षा जास्त कन्नड चित्रपटात अभिनय केला आहे.  बाल कलाकार म्हणून पुनित यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता. ‘अभी’, अप्पू, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरासु’, ‘राम’, ‘हुडुगारु’ आणि‘अंजनी पुत्र’ यासारख्या चित्रपटात काम केलं आहे. पुनित राजकुमार यांचा अखेरचा चित्रपट युवारत्न हा होय. गतवर्षी हा चित्रपट रिलीज झाला होता. 

 

महत्त्वाच्या बातम्या

59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
Maniesh Paul Paranormal Experiences: 'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
Thalapathy Vijay Son Jason Sanjay: ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
Netflix Web Series Love: डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget