एक्स्प्लोर

Prithvi Shaw Akriti Agarwal Patch Up: 'माझ्याकडून मोठी चूक झालीय...', पृथ्वी शॉवर धोका दिल्याचा आरोप करुन मोडला साखरपुडा, आता 26 दिवसांनी गर्लफ्रेंडची पॅचअपची पोस्ट

Prithvi Shaw Akriti Agarwal Patch Up: भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉची होणारी पत्नी आकृति अग्रवाल हिनं त्याच्याशी पुन्हा जुळवून घेतलं असून, महिनाभरापूर्वी मोडलेला साखरपुडा... पण आता पुन्हा पोस्ट करत म्हणाली, आम्ही पुन्हा एकत्र आलोय...

Prithvi Shaw Akriti Agarwal Patch Up: भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ (Cricketer Prithvi Shaw) आणि आकृति अग्रवाल (Akriti Agarwal) यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू होत्या. पृथ्वी आणि आकृतिनं काही दिवसांपूर्वी केलेल्या पोस्टनंतर दोघांच्याही नात्यात मिठाचा खडा पडलेला. साधारणतः महिनाभरापूर्वीच दोघांनी साखरपुडा मोडल्याच्या आणि वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलेलं. पण, आता दोघांच्याही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे, दोघांनीही पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पृथ्वी आणि आकृतीचं (Prithvi Shaw Akriti Agarwal Patch Up) पॅचअप झालंय आणि दोघेही पुन्हा एकदा एकत्र आलेत. चाहते मात्र यामुळे पुरते गोंधळले आहेत. नेमकं दोघांमध्ये काय झालेलं? हा काय खेळ आहे काय? अशा कमेंट्स नेटकऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. 

आकृति अग्रवालनं पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या नात्याबाबत सर्वांना माहिती दिलीय. तसेच, साखरपुडा मोडल्याच्या पोस्टवरही दोघांनी स्पष्टीकरण दिलंय. त्यांचं म्हणणं आहे की, त्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्यात आलेली, त्यामुळे ते परिस्थिती समजू शकले नाहीत. 

आकृती अग्रवालचं साखरपुडा मोडण्याबाबत स्पष्टीकरण... (Akriti Agarwal Post On Patch Up With Prithvi Shaw)

आकृती अग्रवालनं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून पृथ्वी शॉसोबतच्या तिच्या नात्याबद्दल आणि त्यांचा साखरपुडा मोडण्यामागच्या कारणांबद्दल स्पष्टीकरण दिलंय. "A Personal Clarification" असं शीर्षक असलेल्या या पोस्टमध्ये साखरपुडा का मोडला? यावर स्पष्टपणे भाष्य करण्यात आलंय. यामध्ये आकृति अग्रवालनं लिहिलंय की, "जेव्हा मी माझा साखरपुडा मोडला, तेव्हा मी माझ्या जवळच्या लोकांची मतं अशा व्यक्तींसोबत शेअर केली ज्यांना आमचं नातं अधिक चांगल्या प्रकारे समजले होते. त्यांच्या दृष्टिकोनाचा माझ्या होणाऱ्या पतीकडे आणि आमच्या नात्याकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टिकोनावर प्रभाव पडला..."

आकृतिनं पुढे म्हटलंय की, "मला वाटतंय की, माझी दिशाभूल करण्यात आली आणि ज्या प्रामाणिक संवादाची आम्हाला गरज होती, तो न होताच आम्ही निर्णय घेतला..." मात्र, ज्यांच्या बोलण्यामुळे ती भरकटली, त्या विशिष्ट व्यक्तींची नावं तिनं यात नमूद केलेली नाहीत. या पोस्टमध्ये तिनं परिस्थितीची पूर्ण जबाबदारी स्वीकारलीय, तिनं लिहिलंय की, "घेतलेले सर्व निर्णय आणि त्यामुळे झालेली वेदना या सर्वांची मी पूर्ण जबाबदारी स्वीकारते..."

पृथ्वी शॉ-आकृति अग्रवाल फिर होंगे साथ, सगाई तोड़ने पर बोलीं- 'गुमराह किया गया...

आम्ही पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतलाय : आकृति अग्रवाल

एवढंच नाहीतर आकृति अग्रवालनं आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की, "आम्ही आमच्या कुटुंबीयांशी मोकळेपणानं संवाद साधला आणि एकमेकांना समजून घेतलं. आम्ही पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. आम्ही एकमेकांसाठी पुरेसे आहोत, आम्हाला इतर कोणाचीही गरज नाही. सध्या, आमचं भविष्य आमच्या परस्पर सामंजस्य, विश्वास आणि प्रेमावर आधारित असावं, अशी माझी इच्छा आहे." तिनं पुढे लिहिलंय की, "आम्ही नव्यानं सुरुवात करत असताना कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा..." मात्र, पृथ्वी शॉ याच्याकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन आलेलं नाही.

मार्चमध्ये साखरपुडा अन् सप्टेंबरमध् संपवलेलं नातं 

विशेष म्हणजे, पृथ्वी आणि आकृति यांनी या वर्षी मार्चमध्ये त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांचं नातं सहा महिनेही टिकलेलं नाही आणि सप्टेंबरमध्ये आकृतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. वेगळं होण्यामागे उद्दिष्ट आणि परिस्थितीतील तफावत ही कारणं असल्याचं सांगणारी एक पोस्ट तिनं शेअर केली होती. हा निर्णय परस्पर संमतीनं घेतल्याचंही तिनं नमूद केलं आणि या प्रकरणाबाबत तर्क-वितर्क न करण्याची विनंती केली.

वेगळं होण्यापूर्वी, या नात्यात आकृतीची फसवणूक झाली असावी, अशी चर्चा रंगली होती. जुलैमध्ये तिनं फसवणुकीबाबत एक पोस्ट शेअर केल्यानंतर या अफवांना उधाण आलं होतं. मात्र, नंतर आकृतीनं स्पष्ट केलं की, ती पोस्ट त्या क्रिकेटपटूसाठी नव्हती आणि ती पृथ्वी शॉसोबत आनंदी असल्याचं तिनं सांगितलंय.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Attack Case: ‘डेड लेटर बॉक्स’ने हत्यारे पाठवली, राधा-बबिताच्या हातावर अवघे 10-12 हजार टेकवले, टायगर श्रॉफच्या हल्ल्यामागील शस्त्रपुरवठ्याचा हादरवणारा घटनाक्रम
‘डेड लेटर बॉक्स’ने हत्यारे पाठवली, राधा-बबिताच्या हातावर अवघे 10-12 हजार टेकवले, टायगर श्रॉफच्या हल्ल्यामागील शस्त्रपुरवठ्याचा हादरवणारा घटनाक्रम
Tiger Shroff Taxi Driver: 'मी त्यांना सुरत रेल्वे स्टेशनवर सोडलं'; कॅब ड्रायव्हरचा 1 कॉल अन् आरोपींचे पितळ उघड, पोलिसांना आरोपींचा सुगावा कसा लागला?
'मी त्यांना सुरत रेल्वे स्टेशनवर सोडलं'; कॅब ड्रायव्हरचा 1 कॉल अन् आरोपींचे पितळ उघड, पोलिसांना आरोपींचा सुगावा कसा लागला?
Tiger Shroff Rapido Post: टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणातील आरोपी रॅपिडो ड्रायव्हर? कंपनीची पोस्ट व्हायरल, थेट कुंडलीच काढली, म्हणाले घटनेच्या दिवशी...
टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणातील आरोपी रॅपिडो ड्रायव्हर? कंपनीची पोस्ट व्हायरल, थेट कुंडलीच काढली, म्हणाले घटनेच्या दिवशी...
Darlings Actress Death: आलिया भट्टच्या को-स्टारचं निधन; विद्या बालनसोबतही स्क्रीन केली शेअर, बॉलिवूड अभिनेत्रीच्या निधनामुळे मैत्रिणीला बसला धक्का
आलिया भट्टच्या को-स्टारचं निधन; विद्या बालनसोबतही स्क्रीन केली शेअर, बॉलिवूड अभिनेत्रीच्या निधनामुळे मैत्रिणीला बसला धक्का
Advertisement

व्हिडीओ

Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : गोकुळचा विषय काढताच भाजप उमेदवार स्मिता जाधवांनी काढला पळ; मामा सतेज पाटलांच्या विजयावर प्रतिक्रिया विचारताच म्हणाल्या...
गोकुळचा विषय काढताच भाजप उमेदवार स्मिता जाधवांनी काढला पळ; मामा सतेज पाटलांच्या विजयावर प्रतिक्रिया विचारताच म्हणाल्या...
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेची निवडणूक लागणार की बिनविरोध होणार? महायुती अन् महाविकास आघाडीत बैठकांचा जोर
सांगली जिल्हा बँकेची निवडणूक लागणार की बिनविरोध होणार? महायुती अन् महाविकास आघाडीत बैठकांचा जोर
Thane Crime Chena Forest: बॅटरीच्या प्रकाशाला प्राण्याचे डोळे समजून गोळी झाडली, घोडबंदरच्या चेना जंगलात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू, डॉक्टरसह सहा जणांना अटक
बॅटरीच्या प्रकाशाला प्राण्याचे डोळे समजून गोळी झाडली, घोडबंदरच्या चेना जंगलात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू, डॉक्टरसह सहा जणांना अटक
Tiger Shroff Rapido Post: टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणातील आरोपी रॅपिडो ड्रायव्हर? कंपनीची पोस्ट व्हायरल, थेट कुंडलीच काढली, म्हणाले घटनेच्या दिवशी...
टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणातील आरोपी रॅपिडो ड्रायव्हर? कंपनीची पोस्ट व्हायरल, थेट कुंडलीच काढली, म्हणाले घटनेच्या दिवशी...
Ramdas Kadam and Manoj Jarange: उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
IND Vs NZ 1st T20 Playing-11 : भुवनेश्वर कुमार IN, वैभवसह 4 खेळाडू OUT; न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी माजी क्रिकेटपटूने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing-11
भुवनेश्वर कुमार IN, वैभवसह 4 खेळाडू OUT; न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी माजी क्रिकेटपटूने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing-11
Rohit Pawar: रोहित पवार म्हणाले 'आम्ही आमची लेव्हल बघून बोलतो', राजेंद्र राऊतांचा पलटवार, 'रोहित पिल्लू तू जास्त शहाणपणा...'
रोहित पवार म्हणाले 'आम्ही आमची लेव्हल बघून बोलतो', राजेंद्र राऊतांचा पलटवार, 'रोहित पिल्लू तू जास्त शहाणपणा...'
Darlings Actress Death: आलिया भट्टच्या को-स्टारचं निधन; विद्या बालनसोबतही स्क्रीन केली शेअर, बॉलिवूड अभिनेत्रीच्या निधनामुळे मैत्रिणीला बसला धक्का
आलिया भट्टच्या को-स्टारचं निधन; विद्या बालनसोबतही स्क्रीन केली शेअर, बॉलिवूड अभिनेत्रीच्या निधनामुळे मैत्रिणीला बसला धक्का
Embed widget