एक्स्प्लोर

Pravin Tarde On Petrol Diesel Prices: शेतकऱ्यांच्या पेट्रोल पंपाबाहेर रांगा, प्रवीण तरडेंची पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरावर प्रतिक्रिया, म्हणाले ..

पश्चिम आशियातील चालू असलेल्या भू-राजकीय संकटाने भारताच्या ऊर्जा आयात बिलावर दबाव वाढवला आहे.

कोल्हापूर : भारतात पेट्रोल डिझेलच्या सातत्याने वाढत्या किमतींमुळे देशभरात मोठ्या गोंधळाचे वातावरण आहे. (Petrol Diesel Prices) शेतकऱ्यांची मशागतपूर्व कामे खोळंबली आहेत. पेट्रोल पंपाच्या बाहेर वाहनधारकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. मे महिन्यात पेट्रोलच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. दरम्यान, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांवरून दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'देऊळ बंद 2' चित्रपटाच्या निमित्ताने प्रवीण तरडे यांच्यासह संपूर्ण टीम कोल्हापुरात होती. करवीर निवासीनी श्री अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतल्यानंतर अभिनेता प्रवीण तरडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले प्रवीण तरडे ?

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना प्रवीण तरडे म्हणाले, “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी देऊळ बंद 2 हा चित्रपट बनवला आहे. मायबाप प्रेक्षकांनी या सिनेमाला प्रचंड गर्दी केली चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षक या सिनेमावर जीव तोडून प्रेम करत आहे. या चित्रपटाची पब्लिसिटी आम्ही करत नाही. तर जो मराठी माणूस हा चित्रपट पाहून येतोय तो सगळीकडे जाऊन या सिनेमाविषयी बोलतोय. त्यामुळे स्नेहल आणि मोहन जोशी यांचा कौतुक आहे. देऊळ बंद हा सिनेमा केला आहे मात्र प्रत्येक मंदिरात जाऊन आम्ही नमस्कार करतोय. शेतकऱ्याच्या घरामध्ये हा सिनेमा पोहोचला पाहिजे कारण त्यांच्या मनात हा चित्रपट गेला पाहिजे. त्याच्या मनात चुकूनही वाईट विचार आला तर तो निघून गेला पाहिजे.सिनेमात शेतकरी हा प्रति परमेश्वर आहे आम्ही म्हटलं. शेतकऱ्यालादेखील असं अर्धवट सोडून आपल्याला जाता येणार नाही.”

तसेच पेट्रोल आणि डिझेल दरवाढीबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “जागतिक स्तरावर सध्या जे काही चालवलं आहे, ही दरवाढ त्यामुळे झाली आहे. युद्धाचे संकट मिटेल त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलचे आकडे पुन्हा एकदा कमी होऊ दे. आई अंबाबाईकडे हेच साकडे घातलं आहे,” असेही प्रवीण तरडे म्हणाले.

देशांतर्गत इंधनाच्या किंमती 

भारत त्याच्या क्रूड तेलाच्या गरजांचा जवळपास 88-90 टक्के आयात करतो, ज्यामुळे जागतिक तेलाच्या किंमतीतील हालचाली आणि रुपया-डॉलर विनिमय दरातील चढउतारांसाठी देशांतर्गत इंधनाच्या किंमती अत्यंत संवेदनशील बनतात. पश्चिम आशियातील चालू असलेल्या भू-राजकीय संकटाने भारताच्या ऊर्जा आयात बिलावर दबाव वाढवला आहे, तर पुरवठा व्यत्यय आणि उच्च मालवाहतूक आणि विमा खर्चाबद्दलच्या चिंतेमुळे शुद्धीकरण आणि इंधन विक्रेत्यांवर आणखी भार पडला आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget