एक्स्प्लोर

Pravin Tarde On Mohan Joshi: 'देऊळ बंद 2'च्या सेटवर प्रविण तरडेंची आदळआपट, चिडचिड; मग मोहन जोशी द्यायचे 'ती' धमकी अन्...; धमाल किस्सा ऐकलात?

सेटवर सगळ्यांवर चिडणाऱ्या प्रवीण तरडेंना शांत करण्यासाठी अभिनेते मोहन जोशी यांनी दिलेल्या धमकीनंतर प्रवीण तरडे यांना पुढे बोलताच यायचं नाही.

Pravin Tarde on Mohan Joshi Deool Band 2: प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) ने बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांची झोकात कमाई केली. (Box Office Collection)या चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर प्रवीण तरडे (Pravin Tarde) आणि संपूर्ण 'देऊळ बंद 2'च्या टीमच्या सक्सेस पार्टीची सध्या मनोरंजनसृष्टीत एकच चर्चा आहे. या ग्रँड पार्टीला मराठी मनोरंजन सृष्टीतील सगळ्या सेलिब्रेटींना आमंत्रण होतं.  चित्रपटादरम्यान घडलेले प्रसंग, किस्से यांची प्रविण तरडेंना काही कमी नाही. सिनेमाच्या सक्सेस पार्टीमध्ये त्यांनी अनेक किस्से सांगत धमाल उडवून दिली.  'देऊळ बंद 2'च्या सेटवर दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे यांचा स्वभाव सगळ्यांनाच अनुभवायला मिळायचा. सेटवर सगळ्यांवर चिडणाऱ्या प्रवीण तरडेंना शांत करण्यासाठी अभिनेते मोहन जोशी यांनी दिलेल्या धमकीनंतर प्रवीण तरडे यांना पुढे बोलताच यायचं नाही.  नुकत्याच झालेल्या सक्सेस पार्टीमध्ये प्रवीण तरडे यांनीच हा किस्सा सांगितलाय.

मोहन जोशींची ती धमकी, अन् प्रविण तरडेंची बोलतीच बंद

'देऊळ बंद 2'च्या सेटवर कामात अडथळा आला, काही चूक झाली की दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची  कलाकार तंत्रज्ञांवर चिडचिड आदळआपट सुरु व्हायची. प्रसंगी शिव्याही द्यायचे. पाहून पाहून एकदा अभिनेते मोहन जोशी यांनी मजेशीर पण थेटच इशारा प्रवीण तरडेंना दिला. मोजोंनी अशी काही धमकी दिली की, प्रवीण तरडेंना पुढे काही बोलताच येईना. प्रवीण तरडे म्हणाले 'मोजो पूर्वी डेंजर होते.आता जास्त डेंजर आहेत ते कसे मी सांगतो. स्वामींच्या भूमिकेसाठी त्यांना नाक आणि कान लावावे लागायचे. मी इकडे आरडाओरडा केला की तिकडे मोजो म्हणायचे 'त्याला सांगा , त्याला सांगा नाहीतर नाक काढीन' कारण नाक परत लावायला तीन तास लागायचे. 'कान काढीन 'ते पुन्हा लावायला लागायचं दीड तास. पूर्ण सिनेमात मी नाकाच्या आणि कानाच्या भीतीने त्यांच्यावर चिडलो नाही.धमकीच असायची. ते नाक जरा इकडे तिकडे झालं की, वाणी सरांना वाटायचं की मी खर्च वाढवला. पण तसं काही नाही याच्यात नाक आणि कानाचाही हात आहे' असं प्रवीण तरडे म्हणाले. त्यावेळी उपस्थित सगळेच जण हसून लोटपोट झाले होते.

'देऊळ बंद 2' चित्रपट अजूनही भारतात आणि परदेशात आवर्जून पाहिला जातोय. अनेक ठिकाणी या सिनेमाचे शो हाऊसफुल आहेत. बॉक्स ऑफिसवर तसेच तंबू शो आणि गावागावात अगदी 10-20 रुपयांमध्ये हा चित्रपट दाखवल्यामुळे महाराष्ट्रभर या शोचा चाहतावर्ग तयार झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. मुंबई,पुणे, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक शो या सिनेमाचे लागले होते. बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक रुपयांचा विक्रम या चित्रपटाने केलाय. मराठी मनोरंजन सृष्टीतील सर्वाधिक चाललेल्या चित्रपटांपैकी क्रमांक एकवर असलेला हा चित्रपट आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
Embed widget