एक्स्प्लोर

Prashant Damle On CJP Protest: 'आता ही भांडणं संपवा, सरकारच्या हातात..' अभिनेते प्रशांत दामलेंची CJP आंदोलकांवर प्रतिक्रिया; VIDEO चर्चेत

या विषयावर कोणत्याही एका बाजूची निवड करणं त्यांनी टाळलं असलं तरी तीन महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.

Prashant Damle On CJP Protest: नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन, सोनम वांगचूक यांचं उपोषण अशा अनेक घडामोडी घडत असताना राजधानीत राजकीय घडामोडींना वेग आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वक्तव्यानंतर सरकार चर्चेसाठी पुढे आले आहे. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर 26 दिवसांचे त्यांचे आमरण उपोषण मागे घेतले. कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले होते. त्यानंतर देशभरातून अनेक कलाकार,  दिग्गज विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आले होते.  अनेकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ करत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. काहींनी विरोध केला. काहींनी मौन बाळगणं पसंत केलं. आता मराठी नाट्यसृष्टीतील दिग्गज अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी लवकरात लवकर भांडणं संपवा असं म्हणत सरकारसह विद्यार्थ्यांची समजूत काढली आहे. या विषयावर कोणत्याही एका बाजूची निवड करणं त्यांनी टाळलं असलं तरी तीन महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. त्यांच्या व्हिडिओची सध्या चर्चा आहे.

काय म्हणाले प्रशांत दामले?

' नमस्कार मंडळी, काय आहे, तुम्ही जशी आजुबाजूची परिस्थिती बघतायात, तशी मीही बोलतोय बरं का.  अनेक जणांनी मला सांगितलं की, प्रशांत भाऊ तुम्ही काहीतरी व्यक्त व्हायला पाहिजे. खरं म्हणजे, मला भांडायला आवडत नाही. मला मारामारी करायला आवडत नाही. पण, आता परिस्थितीच अशी आहे की व्यक्त होणं गरजेचं आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होता कामा नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाच्याही जीवाची हानी होता कामा नये. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट अशीय की - भांडणं ही तात्पुरती असतात, उद्या आपल्याला पुन्हा एकमेकांना भेटायचंय. गप्पा मारायच्यात . दिवाळी साजरी करायचीय. गणपती साजरा करायचंय. या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र करायच्यात. माझी विनंती आहे, भांडणं थांबवा. आता सरकारनं हात पुढे केलाय. तुम्ही तुमचा हात त्यांच्या हातात द्या. आणि विषय संपवा. विद्यार्थी महत्त्वाचे आहेत. बरोबर की नाही? आपला देश आता पुढे यांच्या हातात आहे. त्यांना वाचवणं, त्यांना शिकवणं हे फार महत्त्वाचंय. त्यामुळे लवकरात लवकर हे मतभेद संपवून टाका. चर्चा करा. संवादाने अनेक गोष्टी मोकळ्या होतात. सुटतात. लवकरात लवकर भांडणं संपवा ही  सगळ्यांना नम्र विनंती.' असं ते म्हणाले आहेत.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Psycho Thriller Movie: सुखी संसार, अचानक विचित्र वागणारी पत्नी अन् एका अनोळखी महिलेचं अस्तित्व; OTT वरचा हा क्लासिक सायकॉलॉजिकल थ्रिलर चुकवू नका
सुखी संसार, अचानक विचित्र वागणारी पत्नी अन् एका अनोळखी महिलेचं अस्तित्व; OTT वरचा हा क्लासिक सायकॉलॉजिकल थ्रिलर चुकवू नका
Govinda and Sunita Ahuja: '3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
'3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
Hema Malini Post On Batwara 1947: लेकाचा 'बटवारा 1947' पाहून हेमा मालिनींची पोस्ट; म्हणाल्या, 'एकमेकांबद्दलचा द्वेष, फूट पाडण्यापेक्षा...'
लेकाचा 'बटवारा 1947' पाहून हेमा मालिनींची पोस्ट; म्हणाल्या, 'एकमेकांबद्दलचा द्वेष, फूट पाडण्यापेक्षा...'
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: नागपंचमीपासून अक्कलकोटमध्ये मोठा उलटफेर; स्वामींना मिळालेल्या चार दिवसांची उलटी गिनती सुरू!
नागपंचमीपासून अक्कलकोटमध्ये मोठा उलटफेर; स्वामींना मिळालेल्या चार दिवसांची उलटी गिनती सुरू!
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Embed widget