Prasad Oak : धर्मवीर चित्रपटात प्रसाद ओकने (Prasad Oak) साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेचं आजही कौतुक होतं. खरंच आनंद दिघे परत आले, अशा प्रतिक्रिया अनेकांनी प्रसादला दिल्या होत्या. धर्मवीर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या शुटींगला देखील सुरुवात करण्यात आलीये. चंद्रमुखी, हिरकणी, कच्चा लिंबू अशा दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शनंही प्रसादने केलं आहे. दरम्यान त्याने कोणावर बायोपिक बनवायला आवडेल या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवारांचा देखील उल्लेख केला आहे. 


महाराष्ट्राच्या राजकारणातल्या मोठ्या नावांपैकी शरद पवार हे एक नाव आहे. आजही शरद पवारांच्या राजकारणाची उदाहरणं आजही अनेक नेते त्यांच्या भाषणातून देतात. 2019च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा शरद पवारांचं राजकारण सगळ्यांनीच अनुभवलं. साताऱ्यातील एका सभेनं महाराष्ट्रातल्या सत्तेची गणितं बदलली. त्याच शरद पवारांची भूमिका साकारण्याची इच्छा प्रसाद ओकने व्यक्त केली आहे. 


कोणचा बायोपिक करायला आवडेल?


महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रसाद ओकने यावर भाष्य केलं आहे. यावेळी त्याला प्रश्न विचारण्यात आला की, कोणाचा बायोपिक करायला तुला आवडेल किंवा कोणाची भूमिका साकारायला आवडेल. यावर प्रसाद ओकने उत्तर दिलं की, मला सदाशिवराव पेशवेंची भूमिका साकारायला आवडेल. अण्णा हजारे, वपु काळे, जब्बार पटेल यांचीही भूमिका साकारायला आवडेल. विशेष मला शरदचंद्र पवार यांची देखील भूमिका करायला आवडेल. त्यांचा बायोपिक देखील दिग्दर्शित करण्याची माझी इच्छा आहे. ते महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. 


प्रसादचा सिनेप्रवास (Prasad Oak Movies)


प्रसाद ओकचा पहिला सिनेमा म्हणजे बॅरिस्टर. या सिनेमासह त्याने ऐका दाजिबा, एक डाव धोबी पछाड, लगे रहो मुन्नाभाई, कलियुग, जेहेर, जोशी की कांबळे, पकडापकडी, हरी माझी घरी, हिप हिप हुर्रे, खेळ मांडला, निर्मला, धतिंग धिंगाणा, बाळकडू, डॉक्टर रमाबाई, 7 रोशन व्हिला, शिकारी, आणि डॉ काशिनाथ घाणेकर, ये रे ये रे पैसा, पिकासु, हिरकणी, धुरळा अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमात त्याने साकारलेली आनंद दिघे यांची भूमिका चांगलीच गाजली. सहाय्यक दिग्दर्शक ते आघाडीचा अभिनेता हा प्रसाद ओकचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. 






ही बातमी वाचा : 


Kartik Aaryan : कार्तिक आर्यन गिरवतोय मराठीचे धडे, ‘चंदू चॅम्पियन’ सिनेमासाठी 14 महिने घेतली कठोर मेहनत