Delhi Capitals Rishabh Pant: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने अतिशय लाजिरवाणी कामगिरी केली. या सामन्यात दिल्लीचा 106 धावांनी पराभव झाला. कोलकाताविरुद्धच्या या पराभवानंतर दिल्लीच्या संघाला आणखी एक धक्का बसला आहे. बीसीसीआयने दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार ऋषभ पंतवर कारवाई केली आहे. 


स्लो ओव्हर रेटमुळे बीसीसीआयने ऋषभ पंतवर कारवाई केली आहे. या मोसमात ऋषभ पंतला स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्याची ही दुसरी वेळ आहे. यावेळी बीसीसीआयने त्याच्यावर 24 लाखांचा दंड ठोठावला आहे. त्याचवेळी, मागील सामन्यात ऋषभ पंतवर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीला या दोन्ही सामन्यांमध्ये नियमित वेळेत 20 षटकेही पूर्ण करता आली नाहीत. त्याचवेळी, यावेळी पंतसह संघातील इतर खेळाडूंनाही 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25% दंड ठोठावण्यात आला आहे.


दिल्ली कॅपिटल्सला काळजी घ्यावी लागेल


स्लो ओव्हर रेट नियमानुसार, संघाला 90 मिनिटांत 20 षटके पूर्ण करावी लागतात. आम्ही तुम्हाला सांगतो, दिल्ली कॅपिटल्स संघाला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 20 षटके टाकण्यासाठी 2 तास लागले. त्याचवेळी CSK विरुद्ध संघ निर्धारित वेळेपेक्षा 3 षटके मागे धावत होता. या कारणास्तव, शेवटच्या दोन षटकांमध्ये संघाला 4 ऐवजी 5 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आत ठेवावे लागले.


पंतवर बंदीचा धोका!


स्लो ओव्हर रेटच्या नियमांनुसार, एकाच हंगामात दुसऱ्यांदा ही चूक झाल्यास कर्णधाराला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात येतो. संघातील इतर खेळाडूंनाही 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25% दंड ठोठावण्यात येतो. तिसऱ्यांदा ही चूक केल्यावर कर्णधारावर 30 लाख रुपयांसह एका सामन्याची बंदी घालण्यात येईल. यासोबतच संघातील उर्वरित खेळाडूंकडून प्रत्येकी 12 लाख रुपये किंवा 50 टक्के दंड आकारण्यात येईल. अशा परिस्थितीत पंतने या मोसमात दोनदा ही चूक केली आहे, जर पंतने आणखी एकदा स्लो ओव्हरचा नियम मोडल्यास त्यावर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते.






केकेआरविरुद्ध दारुन पराभव-


कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात काल विशाखापट्टणम येथे सामना खेळला गेला. केकेआरने प्रथम खेळताना 272 धावा केल्या. सुनील नरेन आणि अंगक्रिश रघुवंशी यांच्या अर्धशतकांव्यतिरिक्त आंद्रे रसेलच्या 41 धावांच्या तुफानी खेळीनेही कोलकाताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खूपच खराब झाली होती ज्यातून त्यांना शेवटपर्यंत सावरता आले नाही. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने 55 धावा केल्या आणि ट्रिस्टन स्टब्सने 54 धावांची अर्धशतकी खेळी खेळली असली तरी दिल्लीचा 106 धावांनी पराभव झाला. 


संबंधित बातम्या-


18 वर्षांच्या अंगक्रिश रघुवंशीने दिल्लीला अस्मान दाखवलं; आई-वडिलांनी केलंय भारताचं प्रतिनिधित्व


DC vs KKR: दिल्लीच्या पंतने गोलंदाजाला धुतलं, केकेआरच्या मालकाने काय केलं?, शाहरुन खानचं होतंय कौतुक,Video


आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, Photos