एक्स्प्लोर

सलमान खानच्या RSS कार्यक्रमातील उपस्थितीवर प्रसाद ओकची प्रतिक्रिया, म्हणाला, 'त्यानं संघाच्या कार्यक्रमात येणं, हे एकप्रकारे..

Prasad Oak Reacts To Salman Khan Attending RSS Programme: RSS च्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत भव्य कार्यक्रमाचं आयोजन. सलमान खानच्या उपस्थितीने कार्यक्रमात सर्वांचं लक्ष वेधलं.

Prasad Oak Reacts To Salman Khan Attending RSS Programme: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष सुरू आहे. 100व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील नेहरू सेंटर येथे संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली.  शनिवारी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत  मोहन भागवत यांच्या उपस्थितीत 'नवे क्षितीज' या नावाने व्याख्यानमालेला सुरुवात झाली. आज व्याख्यानमालेचा शेवटचा दिवस. मोहन भागवत आणि उपस्थितांमध्ये प्रश्नोत्तरेचा सत्र पार पडत आहे. 

काल भव्य दिव्य कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला.  या उद्घाटन सोहळ्यात सलमान खानपासून हेमा मालिनीपर्यंत दिग्गज कलाकारांची हजेरी पाहायला मिळाली.  दरम्यान,   या कार्यक्रमात सलमान खानची एन्ट्री होताच कॅमेऱ्यांची तोंडं आपसुकच त्याच्याकडे वळली. सलमान खानला पाहताच सर्वांच्या भुवया उंचावल्या.  आज व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी मराठी सिनेकलाकारांनी हजेरी लावली. प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर, प्रसाद ओक आणि सुनील बर्वे उपस्थित होते.  'सलमान खानची उपस्थिती माझ्यासाठी शॉकिंग होती', असं प्रसाद ओक म्हणाले.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

प्रसाद ओकनं आजच्या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात हजेरी लावली.  प्रसाद ओक म्हणाला, "हे दृश्य खूपच इंटरेस्टिंग वाटलं.  सलमान खानचं संघाच्या कार्यक्रमात येणं, हे एकप्रकारे संघाच्या कार्याप्रति त्याने दाखवलेला सन्मान आहे, असं मला वाटतं.  त्याने या कार्यक्रमात हजेरी लावली, हे मला खूप आवडलं", असं  प्रसाद ओक म्हणाले. 

तर, 'संघाचे विचार ऐकण्यासाठी सलमान खान आला ही चांगली गोष्ट आहे', असं सुनील बर्वे म्हणाले. "तो एक चांगला माणूस आहे.  त्याला चांगलं वागण्याची आणि आदर्श लोकांसमोर ठेवण्याची आवड आहे.  त्याचे काही संघाविषयी किंतु परंतु असतील, त्याचे उत्तर शोधण्यासाठी तो इथे आला असावा. ही चांगली गोष्ट आहे. त्याचं स्वागतच आहे", असं सुनील बर्वे म्हणाले.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

आजच्या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. अभिनेता अक्षय कुमार, आणि जॅकी श्रॉफ या दिग्गज कलाकारांचीही हजेरी पाहायला मिळाली.

 

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget