एक्स्प्लोर

Pranit More Delete Instagram Page: 'त्या' व्हिडीओनंतर प्रचंड टीकेची झोड, प्रणित मोरेचा इन्स्टाग्राम पेजबाबत मोठा निर्णय, डायरेक्ट पेजच....

शोमध्ये उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकाने स्वतःच्या डेटिंगचा अनुभव सांगताना महिलांबाबत आक्षेपार्ह आणि असंवेदनशील टिप्पणी केली. या संवादादरम्यान प्रणितही त्याच्या बोलण्यावर हसताना आणि त्याचा आनंद घेताना दिसला.

Pranit More Delete Instagram Account: स्टँड-अप कॉमेडियन आणि 'बिग बॉस'चा माजी स्पर्धक प्रणित मोरे (Pranit More) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी त्याच्या विनोदांपेक्षा एका वादग्रस्त घटनेमुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. अलिकडेच व्हायरल झालेल्या '370 बिर्याणी' प्रकरणाने वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर जाहीर माफीनामा त्याला प्रसिद्ध करावा लागला. महिलांबाबत होणाऱ्या घृणास्पद कमेंटवर हसत राहिल्यानं प्रचंड ट्रोलिंगला त्याला सामोरं जावं लागलं. वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रणितने मोठा निर्णय घेतला असून आपले इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केलंय. (Biryani Controversy)

हा संपूर्ण वाद प्रणितच्या एका लाइव्ह शोदरम्यान घडलेल्या घटनेमुळे सुरू झाला. शोमध्ये उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकाने स्वतःच्या डेटिंगचा अनुभव सांगताना महिलांबाबत आक्षेपार्ह आणि असंवेदनशील टिप्पणी केली. या संवादादरम्यान प्रणितही त्याच्या बोलण्यावर हसताना आणि त्याचा आनंद घेताना दिसला. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा सोडून केलेल्या त्या व्हिडीओमुळे प्रणित मोरेनं इस्टाग्रॅम अकाउंट बंद करून टाकलंय.

'370 रुपयांच्या बिर्याणी'वरून सुरू झाला वाद

व्हायरल व्हिडीओमध्ये हिमांशू जांगरा नावाच्या तरुणाने एका महिलेसोबत डेटसाठी बाहेर गेल्याचा अनुभव सांगितला. दोघांनी मिळून चिकन बिर्याणी खाल्ली होती, ज्यासाठी त्याने 370 रुपये खर्च केल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित महिलेने त्याला घरी सोडण्याची विनंती केल्यावर आपण खर्च केलेल्या पैशांची 'वसुली' करणारअसं म्हणत महिलेशी शारिरीक संबंध ठेवल्याचं सांगितलं. त्याच्या वक्तव्यावर उपस्थित तरुणवर्ग टाळ्या वाजवून, दाद देऊन त्याला ऐकत होता. चालू शोमध्ये हे सगळं सुरु होतं. एवढंच नाही, तर आक्षेपार्ह प्रतिक्रिया देऊनही तरुण हिमांशू जांगडा बरळतच राहिला. डेट करत असलेल्या महिलेसोबत त्याने कशी जवळीक साधली, तिला कुठे स्पर्श केला असे तपशीलही तो रंगवून सांगू लागला. हा व्हिडिओ व्हायरल होताच यातील अनेक क्लिप्स व्हायरल झाल्या. नंतर  मात्र या वक्तव्यावर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झालं. 

कुशा कपिला, डॉली सिंह यांचीही टीका

वाद वाढल्यानंतर कंटेंट क्रिएटर आणि अभिनेत्री कुशा कपिला तसेच इन्फ्लुएंसर डॉली सिंह यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. कुशा कपिलाने सोशल मीडियावर पोस्ट करत महिलांविषयी अशा प्रकारच्या वक्तव्यांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले. तसेच पुरुषांनी अशा टिप्पण्यांना पाठिंबा न देता त्यावर आक्षेप घेण्याची गरज असल्याचेही तिने म्हटलं. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर प्रणित मोरेने इन्स्टाग्राम अकाउंट हटवल्याची माहिती समोर आली असून, त्यावरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget