एक्स्प्लोर

घर शिफ्टिंगचं काम पडलं महागात! मुंबईत प्रसिद्ध अभिनेत्रीची ऑनलाइन मूव्हर्सकडून फसवणूक, नेमकं काय घडलं?

या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे.

Mumbai Crime: मुंबईत घर शोधणं जितकं अवघड तितकं ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणं तितकंच कठीण. घर शिफ्ट करताना एखाद्या मूव्हर्स अँड पॅकर्सला पैसे देऊन वेळ वाचवणं कधीही श्रेयस्कर वाटत असेल तर थांबा. यातही फसवणूक होतेय. मुंबईत घर शिफ्टिंगसाठी ऑनलाइन मूव्हर्स अँड पॅकर्स बुक करताना सावध राहण्याचा इशारा देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाड परिसरात राहणाऱ्या फिल्म अभिनेत्री खुशी चौधरी (Khushi Chaudhari) यांची ऑनलाइन मूव्हर्स अँड पॅकर्सकडून फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. ख़ुशी चौधरी ही हिंदी टीव्ही  विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने कुंडली भाग्य या मालिकेतून घराघरात प्रसिद्धी मिळवली 

नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री खुशी चौधरी यांना मुंबईहून उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घरातील सामान पाठवायचे होते. यासाठी त्यांनी ऑनलाइन माध्यमातून मूव्हर्स अँड पॅकर्स सेवा बुक केली. काही दिवसांत संबंधित कंपनीची टीम त्यांच्या घरी पोहोचली. घरातील सामानाचे वजन करून ते टेम्पोमध्ये भरले गेले. यावेळी 11 हजार 700 रुपयांचे बिल देण्यात आले आणि तीन दिवसांत सामान गाझियाबादला पोहोचेल, असे आश्वासन देण्यात आले.

मात्र, त्यानंतर खरा प्रकार समोर आला. संबंधित मूव्हर्स अँड पॅकर्सकडून अभिनेत्रीला वारंवार फोन करून शिपमेंटमध्ये बदल झाल्याचे सांगण्यात आले. वजन दुप्पट असल्याचे कारण देत अधिक पैशांची मागणी करण्यात येऊ लागली. तब्बल एक महिन्यापर्यंत त्यांना वेगवेगळी कारणे सांगून फिरवण्यात आले. सामान न पोहोचल्याने आणि वारंवार पैशांची मागणी होत असल्याने अभिनेत्रीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

यानंतर खुशी चौधरी यांनी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपास, कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान एका आरोपीला अटक करण्यात आली. तसेच अभिनेत्रीचे घरगुती सामान चांदीवली परिसरातील एका गोदामातून जप्त करून सुरक्षितपणे त्यांना परत करण्यात आले. या संपूर्ण कारवाईनंतर अभिनेत्री खुशी चौधरी यांनी मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत आभार मानले.

महत्त्वाच्या बातम्या

FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
'आता बघवत नाहीय' सोनम वांगचुक यांच्या सपोर्टसाठी आख्खं बॉलिवूड एकवटलं! सोनाक्षी सिन्हासह, या सेलिब्रेटींचे सरकारला थेट सवाल
'आता बघवत नाहीय' सोनम वांगचुक यांच्या सपोर्टसाठी आख्खं बॉलिवूड एकवटलं! सोनाक्षी सिन्हासह, या सेलिब्रेटींचे सरकारला थेट सवाल
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
DEool Band Child Actress:'देऊळ बंद' नंतर डोक्यात हवा गेली, 'त्या' आगाऊ कमेंटनंतर आईने व्हॅनिटीत नेऊन अक्षरशः तुडवलं; अभिनेत्रीची कबुली
'देऊळ बंद' नंतर डोक्यात हवा गेली, 'त्या' आगाऊ कमेंटनंतर आईने व्हॅनिटीत नेऊन अक्षरशः तुडवलं; अभिनेत्रीची कबुली

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget