Cannes 2022 : कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 (Cannes Film Festival 2022) मध्ये बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली. दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि  ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) या अभिनेत्रींनी याआधी देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर वॉक केला होता. पण यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशी रौतेला आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) या पहिल्यांदाच रेड कार्पेटवर वॉक करणार होत्या. त्या दोघींच्या रेड कार्पेटवरील लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं पण पूजा हेडगे ही रेड कार्पेटवर जाण्याआधी तिच्यासोबत एक घटना घडली. 


सर्व सामान झालं गायब 
पूजा ही तिचं सर्व सामान देऊन कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी गेली होती. फेस्टिव्हलच्या प्रत्येक दिवसाचे पूजाचे डिझायनर आउटफिट, मेकअप आणि ज्वेलरी  हे एका सूटकेसमध्ये ठेवण्यात आले होते. पण हा सूटकेस ती रेड कार्पेटवर जाण्याआधी गायब झाला. पूजा हेगडेनं Film Companion ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या घटनेबाबत सांगितलं. मेकअप, ड्रेस,  परफ्यूम, खरे दागिने इत्यादी सामान पूजाच्या सूटकेसमध्ये होते.  मुलाखतीमध्ये पूजानं सांगितलं की त्या सूटकेसमध्ये ती जे ड्रेस कान्स फिल्स फेस्टिव्हलमध्ये परिधान करणार होती, ते होते. ऐनवेळी सूटकेस गायब झाल्यानं पूजाला रडू येत हेते. पण नंतर सर्व गोष्टी पुन्हा मॅनेज करण्यात आल्या. पूजानं रेड कार्पेटवरील प्रत्येक दिवसाच्या लूकचे फोटो शेअर केले. 






यंदाच्या कान्स महोत्सवात भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर देखील यावेळी कान्समध्ये सहभागी झाले. तसेच नयनतारा,पूजा हेगडे,हिना खान,नवाजुद्दीन सिद्दीकी , आर माधवन या बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. 


हेही वाचा :