Ponniyin Selvan 1 OTT Release : बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केल्यानंतर, मणिरत्नमचा 'पोन्नियिन सेल्वन 1' (Ponniyin Selvan 1) 4 नोव्हेंबरपासून अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) व्हिडीओवर स्ट्रीमिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. कल्की कृष्णमूर्ती यांच्या ऐतिहासिक कादंबरीवर आधारित हा ऐतिहासिक ड्रामा आहे. 


ऐश्वर्या राय बच्चन, विक्रम, जयम रवी, कार्थी आणि इतर कलाकारांसह Ponniyin Selvan 1 हा सिनेमा 30 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. आणि या वर्षातील संपूर्ण भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक चित्रपट ठरला. हा चित्रपट संपूर्ण भारतात तमिळ, तेलगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम अशा भाषांत प्रदर्शित झाला. हा चित्रपट आता Amazon प्राईम व्हिडीओवर स्ट्रीमिंगसाठी सज्ज झाला आहे. जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही तो रेंटवर पाहू शकता. किंवा 4 नोव्हेंबरपासून तुम्ही अॅमेझॉन प्राइमवर पाहू शकता.  


बॉक्स ऑफिसची कमाई


PS1 ने जगभरात 464.09 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ज्यामुळे रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या 2.0 नंतर हा दुसरा सर्वाधिक तमिळ चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मणिरत्नम म्हणाले की, पोन्नियिन सेल्वन 1 चे दिग्दर्शन करणे ही त्यांच्यासाठी एक स्वप्नपूर्तीच होती.   


मुंबईतील एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते, "पीएस (पोन्नियिन सेल्वन) हे खूप दिवसांपासून एक स्वप्न होतं. मी माझ्या शालेय जीवनात असताना हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं होतं. मला कधीच वाटलं नव्हतं की मी या चित्रपटाचा एक भाग असेन किंवा मी तो बनवू शकेन." पुढे ते म्हणाले की, "या चित्रपटासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो."


महत्वाच्या बातम्या : 


Ponniyin Selvan box office collection : 'पोन्नियिन सेलवन'ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट; पाच दिवसांत केली 150 कोटींची कमाई