PM Modi Hanuman Ansh Parvati Song: PM मोदींसमोर 'हनुमान अंश'मधील ‘पार्वती’ भजन वाजताच खंजरी वाजवत मोदीही झाले तल्लीन, Video
हे भजन सुरू असताना त्यांनी भजनाच्या तालावर खंजरी वाद्य वाजवत ठेका धरला होता.

Hanuman Ansh PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुक्रवारी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘भजन क्लबिंग’ कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी तरुणांमध्ये बसून भक्तिगीतांचा आनंद घेतला. विशेष म्हणजे, ‘हनुमान अंश’ (Hanuman Ansh) चित्रपटाचे दिग्दर्शक आणि गायक विशाल चतुर्वेदी यांनी सादर केलेल्या भक्तिगीतांदरम्यान पीएम मोदी खंजरी वाजवत ताल्लिन झाले होते. दीनदयाल उपाध्याय यांच्या 110व्या जयंतीनिमित्त भाजप मुख्यालयासमोरील पार्कमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ‘हनुमान अंश’चे लेखक-दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांनी ‘हनुमान चालीसा’ आणि एका भजनाचे सादरीकरण केले.
‘भजन क्लबिंग’ हा तरुणांमध्ये लोकप्रिय होत असलेला एक लोकप्रिय सांस्कृतिक ट्रेंड आहे. कॉन्सर्टसारख्या वातावरणात तरुण एकत्र येतात, भक्तिगीते म्हणतात, टाळ्या वाजवतात आणि संगीताच्या तालावर सहभागी होतात. पारंपरिक आध्यात्मिक गीतांना आधुनिक संगीताची जोड देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमांमध्ये केला जातो.
पीएम मोदींनी वाजवली खंजरी
पीएम मोदी प्रेक्षकांमध्ये बसलेले दिसले. भगवान रामाला समर्पित भजन सुरू ते तल्लीन झाले होते . हे भजन सुरू असताना त्यांनी भजनाच्या तालावर खंजरी वाद्य वाजवत ठेका धरला होता.
View this post on Instagram
गायक साधू तिवारी यांनीही या कार्यक्रमात पीएम मोदींसमोर परफॉर्म केलं. त्यांनी ‘हनुमान अंश’ चित्रपटातील ‘पार्वती’ हे गाणं सादर केलं. यावेळी पीएम मोदी उपस्थितांमध्ये बसून खंजरी वाजवत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.या कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.
‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर चर्चा
विशाल चतुर्वेदी लिखित आणि दिग्दर्शित ‘हनुमान अंश’मध्ये चंदन आनंद आणि शोभिनव सत्या प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती सुमारे 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये करण्यात आली. हा चित्रपट 7 ऑगस्ट रोजी कोणत्याही मोठ्या प्रमोशनशिवाय थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. वर्ड ऑफ माऊथमुळे चित्रपटाला नंतर चांगला प्रतिसाद मिळाला.चौथ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली. हनुमान अंशने 300 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा गाठला आहे.
नेमकी काय आहे ‘हनुमान अंश’ची कथा?
‘हनुमान अंश’ हा चित्रपट लक्ष्मण दास यांच्या जीवनप्रवासावर आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रवासावर आधारित आहे. पुढे ते नीम करोली बाबा म्हणून ओळखले जाऊ लागले.चित्रपटात त्यांच्या वयाच्या 13व्या वर्षापासून सुरू होणारा प्रवास आणि पुढे त्यांना मिळालेलं प्रेम व आदर यांची गोष्ट दाखवण्यात आली आहे.





















