एक्स्प्लोर

Pinga g pori pinga: पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत नवा ट्विस्ट; मीनाक्षीचं अपहरण, संशयाची सुई कोणाकडे?

पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे.वल्लरीची चाहती म्हणून बेळगावहून मुंबईत आलेली मीनाक्षी अचानक गायब झालीय

Pinga g pori pinga Marathi serial: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका पिंगा गं पोरी पिंगा’ मध्ये सध्या रहस्य, थरार आणि भावनिक उलथापालथ यांचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. बुलबुल बागेत सुरू असलेलं नाट्यमय वातावरण आणखी गहिरं होत चाललं आहे. वल्लरीची चाहती म्हणून बेळगावहून मुंबईत आलेली मीनाक्षी अचानक गायब झाल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरच्यांना न सांगता परीक्षा देण्यासाठी आलेली ही निरागस, साधी मुलगी कुठे गायब झाली? तिच्या मागे कोण आहे? हा भयानक प्रश्न आता सर्वांच्या मनात घर करून बसला आहे. याचे उत्तर मिळणार आहे मालिकेच्या महारविवार विशेष भागात, जो 14 डिसेंबर रोजी संध्या 7 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

पिंगा गर्ल्सच्या मदतीने शोधमोहिम

मीनाक्षी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच वल्लरी धावतच बुलबुल बागेतल्या सर्व पिंगा गर्ल्सना एकत्र करते. प्रत्येकाची काळजी वाढलेली, मनात भीती तरीही सगळ्या मुली एकजुटीने मीनाक्षीचा शोध घेण्याचा निर्धार करतात. आणि त्यातून सुरू होते तगडी शोधमोहीम… परिसरातील अरुंद गल्ली-बोळ, मैदाने, स्थानकं आणि मीनाक्षी शेवटची दिसली त्या भागात मुली अविरत फिरत राहतात. चौकशी, शोध आणि धागेदोरे जोडत असताना त्यांना काही धक्कादायक संकेतही मिळू लागतात.

मीनाक्षीचं अपहरण झालंय का? सुगावा लागला

या संशयानं बुलबुल बागेतील वातावरण अधिक गंभीर होतं. त्यातच अलीकडेच या वस्तीमध्ये दाखल झालेली मंजुषा, जी एका प्रतिष्ठित आश्रमाशी जोडलेली असल्याचं सांगते, तिच्यावर संशयाची सुई फिरू लागते. तिचं रहस्यमय वागणं आणि वस्तीतील नव्या हालचाली काहीतरी मोठ्या कटकारस्थानाकडे निर्देश करत असल्याचं पिंगा गर्ल्सच्या लक्षात येतं. सगळ्या मुली एकत्र रात्रंदिवस मीनाक्षीच्या शोधात धडपड करत आहेत. वल्लरीचं मन अधिक बेचैन होत चाललं आहे, कारण प्रत्येक मिळणारा छोटासा पुरावादेखील एका मोठ्या रॅकेटच्या दिशेनं इशारा करत आहे, अशी चर्चा बुलबुल बागेत रंगू लागली आहे.

मीनाक्षी नेमकी कुठे आहे? तिच्या गायब होण्यामागे कोणाचा हात आहे? मंजुषा खरंच संशयित आहे की अजून कोणीतरी सावलीत लपलंय? आणि वल्लरी पिंगा गर्ल्सच्या मदतीनं हे रहस्य उलगडू शकेल का? याचे उत्तर मिळेल 14 डिसेंबरला, महारविवार विशेष भागात, जेव्हा बुलबुल बागेत उलगडणार आहे एक धक्कादायक सत्य!

शोधमोहीम जसजशी खोलात जाते तसतसे काही धक्कादायक संकेत समोर येऊ लागतात. मीनाक्षीचं अपहरण केलं गेल्याची शक्यता बळावते. त्यातच बुलबुल बागेत अलीकडेच दाखल झालेली मंजुषा जी एका प्रतिष्ठित आश्रमाशी जोडलेली आहे तिच्यावर आता संशयाची सुई वळू लागली आहे. अचानक बेपत्ता झालेल्या मीनाक्षीच्या शोधासाठी बुलबुल बागेतली प्रत्येक मुलगी रात्रंदिवस धडपड करत आहे. रहस्य अधिक गडद होत चाललं असून या प्रकरणात मोठ्या रॅकेटचा सुगावा मिळत असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Ramayana Box Office Collection : 'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
Farah Khan : 'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Bhandara News: लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
BMC News: महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
Weather Update: शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
IND VS PAK Asia Cup U19 Final Celebration Video: फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Embed widget