Prajakta Mali - Amruta Khanvilkar : प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) फुलवंती (Phulwanti) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारित ही कथा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. तसेच तिनेच या सिनेमात फुलवंतीची भूमिका साकारलीये. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने चांगली कमाई केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर नुकतच या सिनेमाची सक्सेस पार्टीही झाली. या पार्टीमध्ये मदनमंजिरी या गाण्यावर प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) या दोघीही एकत्र थिरकल्या.
फुलवंती सिनेमातील मदनमंजिरी हे गाणं प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळालं. या गाण्यावर अनेकांनी रिल्सही केले. त्यामुळे सोशल मीडियावर हे गाणं ट्रेंड झाल्याचं पाहायला मिळालं. याच गाण्यावर आता प्राजक्ता आणि अमृतानेही एकत्र डान्स केलाय. सध्या सोशल मीडियावर फुलवंती आणि चंद्राचा हा डान्स व्हिडीओ व्हायरल होतोय.
प्राजक्ता आणि अमृताचा डान्स
काही महिन्यांपूर्वी आलेल्या चंद्रमुखी या सिनेमातील चंद्रा या गाण्यावरही प्राजक्ता आणि अमृता एकत्र थिरकल्या होत्या. त्यानंतर आता फुलवंती सिनेमातील मदनमंजिरी गाण्यावर प्राजक्ता आणि अमृता एकत्र थिरकल्याचं पाहायला मिळालं. वैशाली माडेने या पार्टीमध्ये हे गाणं गायलं आणि त्यावर प्राजक्ता आणि अमृताने ठेका धरला.
सिनेमाची कथा काय?
‘फुलवंती’ ही भारतभर किर्ती असलेली नर्तिका आहे. ज्या भूमिकेत प्राजक्त माळी आहे. ती कार्यक्रमाच्या निमित्तानं तिचं पुण्यात तेही पेशवे दरबारात तिचं येणं होतं. तिथे तिची व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्याशी भेट होते. ही भूमिका अभिनेता गष्मीर महाजनी साकारत आहे. त्यांच्या भेटीनंतर तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण लागतं. नृत्यांगणा ‘फुलवंती’ आणि प्रकांडपंडीत ‘व्यंकट शास्त्री’ यांच्यातील पैज आणि आव्हानांवर हा सिनेमा आधारित आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात मांडण्यात आलीये.