ACC U19 Asia Cup 2024 : अंडर-19 आशिया कपमध्ये भारतीय संघाचा दुसरा सामना जपानविरुद्ध खेळत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. जपानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यातील अनपेक्षित पराभवानंतर टीम इंडियाकडून जोरदार बाउन्स बॅक अपेक्षित होता. सलामीला आलेल्या आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांनीही तेच केले.
टीम इंडियाची स्फोटक सुरुवात
जपानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आयुष आणि वैभवने मिळून त्याची गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. शारजाहमध्ये दोन्ही फलंदाजांनी अवघ्या 44 चेंडूत 65 धावांची भागीदारी केली. भारताला पहिला धक्का वैभवच्या रूपाने बसला. आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. वैभवने 23 चेंडूत 23 धावा केल्या. त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. दुसऱ्या टोकाला आयुषने तुफानी फलंदाजी सुरूच ठेवली. त्याने 29 चेंडूत 54 धावा केल्या. यामध्ये 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. आयुषने 186.21 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.
आयपीएल लिलावात वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले आहे. राजस्थान संघाने बिहारच्या 13 वर्षीय खेळाडूला 1.10 कोटी रुपयांना खरेदी केले. तेव्हापासून वैभव सूर्यवंशीची बॅट गेल्या काही काळापासून शांत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये तो काही खास करू शकला नाही आणि त्यानंतर आता आशिया कपमध्येही त्याची बॅट शांत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सूर्यवंशीने केवळ 1 धाव काढली आणि तो स्वस्तात बाद झाला. आज जपानविरुद्ध त्याने 23 चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याने तीन चौकार आणि एक षटकार मारला पण त्यानंतर 23 धावांवर तो झेलबाद झाला.
CSK ने नाकारल्या खेळाडूचा आशिया कपमध्ये कहर
आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी आयुष म्हात्रे चर्चेत आला होता. मुंबईच्या 17 वर्षीय आयुष म्हात्रेने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने चेन्नई सुपर किंग्ज आणि त्यांचा महान माजी कर्णधार एमएस धोनी यांचे लक्ष वेधून घेतले होते. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सने (CSK) त्याला चाचणीसाठी बोलावले होते. महेंद्रसिंग धोनी त्याच्या फलंदाजीची शैली आणि तंत्राने प्रभावित झाल्याचे वृत्त होते. मात्र, जेव्हा म्हात्रे लिलावात आले तेव्हा सीएसकेने त्यांच्यावर बोली लावली नाही आणि तो विकला गेला नाही.
हे ही वाचा -
Ajinkya Rahane : टीम इंडियात येण्यासाठी धडपड, पण आयपीएलमध्ये कोलकाता संघाची थेट मिळणार कॅप्टनसी