Beed : पत्रकार हे लोकसभेचा चौथा आधारस्तंभ आहेत. असा जावई शोध बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांनी लावला आहे. बीडमध्ये आयोजित आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नागरी सत्कार समारंभ प्रसंगी जाहीर सभेत सोनवणे बोलत होते. यादरम्यान सोनवणे यांची पत्रकारितेवर बोलताना जीभ देखील घसरली आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याची एकच चर्चा रंगली आहे.
विधानसभा निकालानंतर बजरंग सोनवणे यांच्यावर संशय व्यक्त करत एक बातमी एका पत्रकाराने प्रसिद्ध केली होती. यावर बोलताना खासदार बजरंग सोनवणे यांनी संशय तुझ्या बायकोला आणि पोराला आला का? असं म्हणत सोनवणे यांची पत्रकारितेवर बोलताना जीभ घसरली आहे. एवढेच नाही तर पत्रकारिता हा लोकसभेचा चौथा आधार स्तंभ आहे. असा जावई शोध देखील त्यांनी लावलाय. या वक्तव्यानंतर खासदार सोनवणे यांच्या विरोधात टीकेची झोड देखील उठवली जात आहे.
बीडच्या हायहोल्टेज लढतीत पंकजा मुंडेंचा पराभव
बीड लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी 6 हजार 555 मतांनी पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव केला. त्यामुळे हायहोल्टेज लढतीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर महत्वाचा ठरल्याच्या चर्चा झाल्या.
फेरमतदानाची मागणी
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडून बीड विधानसभा मतदारसंघ आणि गेवराई विधानसभा मतदारसंघात फेरमतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे प्रतिनिधी वाल्मीक कराड यांनी फेरमतमोजणी मागणी करण्यात आली होती.
मराठवाड्यात पुनः मतमोजणी साठी 9 जणांनी अर्ज
उमेदवारांची नावे
1-राजू शिंदे-ठाकरे सेना औरंगाबाद पश्चिम
2-बाळासाहेब थोरात ठाकरे सेना औरंगाबाद मध्य
3-नासिर सिद्दीकी एमआयएम औरंगाबाद पूर्व
4-दिनेश परदेशी-ठाकरे सेना वैजापूर
जालना जिल्ह्यातून 1 अर्ज
राजेश टोपे -(घनसावंगी मतदारसंघ )-राष्ट्रवादी शरद पवार .
परभणी जिल्ह्यातून 1 अर्ज
विजय भांबळे -(राष्ट्रवादी शरद पवार जिंतूर विधानसभा).
धाराशिव मधून 3 अर्ज
1)राहुल मोटे - (परंडा विधानसभा)राष्ट्रवादी शरद पवार.
2)प्रवीण रणबागुल - (परंडा विधानसभा)वंचित ..
3)धीरज पाटील - तुळजापूर विधानसभा-(काँग्रेस)
बीड ,लातूर, नांदेड ,हिंगोली येथून एकही अर्ज नाही.
हे ही वाचा