एक्स्प्लोर

Pearl Maaney Followers Drop Student Protest Controversy: प्रसिद्ध अभिनेत्री विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बरळली, 2 दिवसांत गमावले 3 लाख इंस्टाग्राम फॉलोअर्स, झाली टीकेची धनी

Actress Pearl Maaney Followers Drop Student Protest Controversy: विद्यार्थी आंदोलनाबाबत एक इन्स्टा पोस्ट केली आणि त्या पोस्टचं कमेंट सेक्शन बंद केलं. त्यामुळे चाहते तिच्यावर चिडले आणि त्यांनी तिला धडाधड अनफॉलो करायला सुरुवात केली. 

Actress Pearl Maaney Followers Drop Student Protest Controversy: 'बिग बॉस मल्याळम 1'ची (Bigg Boss Malayalam 1) माजी स्पर्धक आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री पर्ल माणे (Famous South Indian Actress Pearle Maaney) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत केलेल्या एका पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिनं नीट परीक्षांमधील (NEET Exams) गैरव्यवहाराविरोधात रस्त्यावर उरतलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत (Student Protest) एक पोस्ट केली. पण, हे करणं तिला खूप महागात पडलंय. तिला दोनच दिवसांत एक-दोन नाहीतर तब्बल 3 लाखांहून अधिक इन्स्टा फॉलोअर्स (Insta Followers) गमवावे लागले आहेत. तिनं विद्यार्थी आंदोलनाबाबत एक इन्स्टा पोस्ट (Insta Post) केली आणि त्या पोस्टचं कमेंट सेक्शन बंद केलं. त्यामुळे चाहते तिच्यावर चिडले आणि त्यांनी तिला धडाधड अनफॉलो करायला सुरुवात केली. 

विद्यार्थी आंदोलनाविरोधात पोस्ट आणि सोशल मीडियावर केलेली तीव्र टीका, यामुळे अवघ्या दोन दिवसांत तिचे 3 लाखांहून अधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्स कमी झाले आहेत. तिनं आपल्या पोस्टवरील 'कमेंट्स' सेक्शन बंद ठेवल्यामुळे वाद आणखीनंच चिघळला आणि चिडलेल्या चाहत्यांनी तिला अनफॉलो करुन टाकलं. 

अभिनेत्री पर्ल माणे हिची सोशल मीडिया पोस्ट काय? (Pearl Maaney Social Media Post)

"कोणताही मुद्दा माणसाच्या जीवापेक्षा मोठा नसतो...", असं म्हणत पर्ल माणे हिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचं वर्णन वेदनादायी आणि हृदयद्रावक असं केलं आहे. तिनं लिहिलंय की, "कोणालाही दुखापत होऊ नये, अशीच माझी इच्छा आहे... कृपया सुरक्षित राहा, जर तुमचा जीव धोक्यात असेल, तर घरी परत या... जीव गमावण्यापेक्षा कोणताही मुद्दा अधिक महत्त्वाचा नाही..."

आपल्या पोस्टमध्ये पुढे बोलताना पर्ल माणे हिनं विद्यार्थी आंदोलनाचा मूळ उद्देश भरकटू नये, अशी आशाही व्यक्त केलेली. या पोस्टसोबतच तिनं कमेंट सेक्शन बंद केलंय. कमेंट्स बंद करणं हा आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच एक भाग असल्याचं तिनं नमूद केलंय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

विद्यार्थी आंदोलनावरची एक पोस्ट अन् गमावले 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स (Pearl Maaney Followers Drop)

कमेंट सेक्शन बंद करण्याचा निर्णय आणि पर्ल माणे हिनं घेतलेली विद्यार्थी आंदोलनाबाबतची भूमिका यामुळे युजर्स संतापले आहेत. तिनं सुखवस्तू परिस्थितीत वाढ केल्यामुळे तिला सामान्य विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या संघर्षाची जाणीव नाही, असा आरोप त्यांनी केलाय. या टीकेच्या लाटेत, तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या 57 लाखांवरून (24 जुलैच्या पोस्टच्या वेळी असलेली संख्या) 54 लाखांवर खाली आली. याव्यतिरिक्त, तिचं युट्यूब चॅनेल आणि फेसबुक पेजवरील फॉलोअर्सच्या संख्येतही घट झाली आहे. युजर्स आपली टीका मांडण्यासाठी तिच्या जुन्या पोस्ट्सवरही जाऊन प्रतिक्रिया देत आहेत.

Pearl Maaney Followers Drop Student Protest Controversy: प्रसिद्ध अभिनेत्री विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बरळली, 2 दिवसांत गमावले 3 लाख इंस्टाग्राम फॉलोअर्स, झाली टीकेची धनी

दरम्यान, 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारं विद्यार्थी आंदोलन जंतर-मंतरवर तब्बल 36 ते 37 दिवसांपासून सुरू होतं. त्यानंतर 20 जुलै रोजी संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चानंतर अख्ख्या देशभरात याचे पडसाद उमटले. अखेर, कॉकरोच जनता पार्टीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या मागण्या मान्य करण्यात आल्या, त्यासोबत तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि विद्यार्थ्यांनी जंतर-मंतरवर विजयोत्सव साजरा केला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget