एक्स्प्लोर

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईची कॅन्सर आजारावर मात; माऊलीच्या लढाईवर वाढदिनी लेक भावुक, म्हणाली..

Payal Jadhav Celebrates Mothers Brave Battle Against Cancer: पायलच्या आईनं यशस्वीरित्या कॅन्सरवर मात केली. तिनं आईच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

Payal Jadhav mother defeats cancer emotional Instagram post: झगमगत्या जगामागे बऱ्याचदा कलाकार दु:खाचे चेहरे लपवतात. दु:ख बाजूला  सारून अनेक कलाकार अभिनयाचा मुखवटा घालतात.  मराठी अभिनेत्री पायाल जाधवसोबत अशीच एक घटना घडली. तिनं आपल्या आईची काळजी घेत, तिला कॅन्सरच्या दाढेतून बाहेर काढले.  पायल जाधवच्या आईनं कॅन्सरसारख्या आजारावर मात केली. दरम्यान, तो काळ नक्कीच माय लेकींसाठी कठीण होता.  या कठीण काळाला मात देत पायल आपल्या आईच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. पायलनं नुकतीच सोशल मीडियावर आईविषयी एक भावनिक पोस्ट लिहिली. तिनं आपल्या आईनं कशापद्धतीने  कॅन्सरवर मात केली, याबाबत माहिती दिली.   

पायल जाधव ही मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री. तिनं आतापर्यंत मालिका तसेच चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली.  अबीर गुलाल या मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.  थ्री ऑफ अस, पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय, या चित्रपटातही तिनं उत्तम भूमिका साकारली.  पायल जाधव सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.  तिनं आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Payal Jadhav (@i_mpayal)

तिनं पोस्टमध्ये म्हटलं की, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी प्रेमळ आई. मला आज एका गोष्टीचा प्रचंड आनंद होत आहे. तू कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर खंबीरपणे मात केलीस. पुन्हा अध्यापनाचं तुझं आवडीचा काम सुरु ठेवलंस. खऱ्या अर्थाने आज तुझा वाढदिवस आहे, असं मला वाटत आहे. तुझ्या या प्रवासात, तुझं लेकरु होता आलं, याचं मला समाधान आहे.  आज तिच्या वाढदिवसानिमित्त  मी त्या सर्वांचे आभार मानेन, ज्यांनी तुला आपलेपणानी मदत केली. आपल्या फॅमिलीसोबत उभे राहिले. तुझ्या हातून कायम शिक्षणाचं कार्य घडत राहो..' असं म्हणत पायलने आपल्या भावना व्यक्त केल्या.

पायलनं पोस्ट करत आईच्या लढाईचं कौतुक केलं आहे. जे कुणी कॅन्सरशी झुंज देत आहेत, त्यांच्यासमोर एक मोठं उदाहरण समोर ठेवलं आहे. पायलच्या आईनं कॅन्सरवर यशस्वी मात केली. तसेच कामाला देखील सुरुवात केली. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी पायलच्या आई वडिलांनी तिच्या निर्णयाचे स्वागत केले. तिच्या करिअरमध्ये तिच्या पालकांचा मोठा वाटा आहे.

 

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dimple Kapadia On Nana Patekar: 'मला नाना पाटेकर किळसवाणे, नकोसे वाटतात... '; ज्या अभिनेत्यासोबत सुपरहिट सिनेमे दिले, त्याच नानांबाबत काय म्हणालेल्या डिंपल कपाडिया?
'मला नाना पाटेकर किळसवाणे, नकोसे वाटतात... '; ज्या अभिनेत्यासोबत सुपरहिट सिनेमे दिले, त्याच नानांबाबत काय म्हणालेल्या डिंपल कपाडिया?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
Shreya Kalra Lock Upp Season 2 Winner: श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस
श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
Embed widget