Pawankhind :

  बॉक्स ऑफिसवर पावनखिंड (Pawankhind) या चित्रपटानं धुमाकूळ घातला. या चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अनेकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या चित्रपटाचं कौतुक केलं. सध्या अनेक निर्माते हे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेत आहेत. पावनखिंड (Pawankhind) हा चित्रपट देखील आता ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. 
 
पावनखिंड हा चित्रपट 20 मार्च रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता ओटीटीवर देखील या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज लावला जाऊ शकतो. 






चिन्मय मांडलेकर,  मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले,  हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड या कलाकारांनी पावनखिंड चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. 


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha