Bella Hadid : अमेरिकन मॉडेल आणि लोकप्रिय सोशल मीडिया सेलिब्रिटी बेला हदीद (Bella Hadid) सध्या तिच्या प्लास्टिक सर्जरीमुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच, वोगला दिलेल्या एका मुलाखतीत 25 वर्षीय मॉडेल मॉडेल बेलाने तिच्या संदर्भातील अनेक अफवांवर खुलासे दिले आहेत. यावेळी तिने सांगितले की, वयाच्या 14 व्या वर्षी नाकावर शस्त्रक्रिया केल्याचा तिला आता पश्चाताप होत आहे. 


बेला म्हणाली की, 'मी माझे नाक माझ्या पूर्वजांप्रमाणे ठेवले असते तर बरं झालं असतं. पण, मला वाटलं की सर्जरीमुळे माझं नाक आणखी सुंदर दिसेल. पण, तसं काहीच झालं नाही. याचं मला आता वाईट वाटतंय.’ यासोबत बेलाने आय लिफ्ट आणि लिप फिलरच्या बातम्या अफवा असल्याचे म्हटले आहे. ती म्हणते की, 'लोकांना वाटते की, माझा चेहरा खराब करून घेतला आहे. टीनेजमधील एक फोटो पाहून असे निष्कर्ष लावले जात आहेत. कारण, त्यात माझा चेहरा थोडा फुगलेला दिसतो आहे. पण, मला खात्री आहे की, वयाच्या 13व्या वर्षी जसे लोक दिसतात ते नंतरही तसेच दिसतील अशे नाही.’



गालांवरही केली शस्त्रक्रिया? 


बेला हदीदने गालावर फिलरही वापरल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले आहे. यावर बोलताना बेला म्हणाली की, 'अशा चर्चा होतात, मला यात काही अडचण नाही. पण, त्यासाठी माझ्यासाठी वेळ नाही.’ डोळे आणि भुवयांवर आपण कोणतीही शस्त्रक्रिया केली नसल्याचेही तिने सांगितले. बेलाचे म्हणणे आहे की, तिचे सुंदर दिसणे जुन्या फॅशन मेकअप हॅकमुळे आहे. हा हॅक सांगताना ती म्हणाली की, ‘ज्यांना असे वाटते की, मी आय लिफ्ट सर्जरी वैगरे केली आहे, तर तसे काहीच नाही. त्यासाठी मी केवळ फेस टेप वापरली आहे.’


गिगी हदीदची बहीण आहे बेला!


बेला हदीद ही गिगी हदीदची धाकटी बहीण आहे. मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये गिगीच्या प्रसिद्धीमुळे बेलानेही यामध्ये आपले नशीब आजमावले. बेला देखील बहिणीप्रमाणे यशस्वी मॉडेल आहे.  


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha