Mishan Impossible : बहुप्रतिक्षित 'मिशन इम्पॉसिबल' (Mishan Impossible) हा सिनेमा 1 एप्रिल 2022 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा तेलुगू सिनेमा असून या सिनेमात तापसी पन्नू (Taapsee Pannu) मुख्य भूमिकेत आहे. स्वरूप आरएसजेने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
टॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता महेश बाबूने 'मिशन इम्पॉसिबल' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च केला आहे. तसेच सिनेमातील कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. तापसी पन्नूनेदेखील या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे.
तापसीचा 'लूप लपेटा' हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. 'शाबाश मिठू' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट भारतीय महिला वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात विजय राजदेखील दिसणार आहे.
संबंधित बातम्या
Bollywood Films : मोंदीच्या काळात विरोधी पक्षांवर टीका करणारे 'हे' सिनेमे झाले प्रदर्शित
Viju Mane : कुठे चाललो आहोत आपण? विजू मानेंनी सिनेप्रेक्षकांवर साधला निशाणा
Chinmay Mandlekar : काश्मिरी पंडितांना बेघर करणारा क्रूर बिट्टा कराटे, चिन्मय मांडलेकरने साकारलेले पात्र पाहून अंगावर येतील शहारे!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha