Pawankhind : पावनखिंड (Pawankhind) या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घालतोय. कलाकारांच्या अभिनयाला तसेच चित्रपटाच्या कथेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. नुकतीच अभिनेता चिन्मय मांडलेकरनं (Chinmay Mandlekar) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये चिन्मयनं प्रेक्षाकंचे आभार मानले आहेत. 


चिन्मयची पोस्ट 
चिन्मयनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रेक्षक पावनखिंड हा चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटगृहामध्ये शिवगीत गाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करून चिन्मयनं कॅप्शनमध्ये लिहिले, 'गेल्या दोन वर्षात अनेकांनी विचारलं की, पावनखिंड OTT वर का प्रदर्शित करत नाही? हे आहे त्याचं उत्तर. स्वास्थ्यासाठी सामाजिक अंतर राखायलाच हवं. पण सामाजिक स्वास्थ्यासाठी लोकांनी एकत्र येऊन काहीतरी साजरं ही करायला हवं. प्रेक्षकहो तुम्ही 'पावनखिंड' साजरा करताय. आम्ही धन्य झालो!' पावनखिंड चित्रपटामध्ये चिन्मयनं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. 






चिन्मय मांडलेकर बरोबरच  मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले,  हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड या कलाकारांनी पावनखिंड चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha