एक्स्प्लोर

Paresh Rawal Returns To Hera Pheri 3: गूड न्यूज! 'हेरा फेरी 3'मध्ये बाबू भैय्यांची वापसी; अक्षय कुमारसोबतचं भांडण मिटलं?

Paresh Rawal Returns To Hera Pheri 3: परेश रावल यांनी पुन्हा एकदा 'हेरा फेरी 3'मध्ये बाबू भैय्याची भूमिका साकारण्यास सहमती दर्शवली आहे. परेश यांनी स्वतः सांगितलं की, आता त्यांचा अक्षय कुमारशी कोणताही वाद नाही.

Paresh Rawal Returns To Hera Pheri 3: गेल्या काही दिवसांपासून परेश रावल (Paresh Rawal) यांची कॉमेडी फिल्म 'हेरा फेरी 3'मध्ये (Hera Pheri 3) वापसी झाली आहे. दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी स्वतः माहिती दिलीय की,  पुन्हा  एकदा ते फिल्ममध्ये बाबू भैय्यांच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. परेश रावल यांनी अक्षय कुमारसोबतच्या (Akshay Kumar) वादावरही भाष्य केलं आहे. तसेच, आता वाद मिटला असून सर्वकाही ठीक आहे, असं परेश रावल यांनी सांगितलं आहे.  

बॉलीवूड हंगामासोबतच्या पॉडकास्टमध्ये बोलताना स्वतः परेश रावल यांनी पुष्टी केली की, ते 'हेरा फेरी 3' करण्यास तयार झाले आहे. अक्षय कुमारसोबतच्या भांडणाबद्दल परेश रावल म्हणाले की, "खरं तर कोणताही वाद नाही. जेव्हा एखादा प्रोजेक्ट प्रेक्षकांना इतका आवडतो, तेव्हा तो अधिक काळजीपूर्वक हाताळावा लागतो."

"आता सर्वकाही ठीक..."

पुढे बोलताना परेश रावल म्हणाले की, "जनतेनं आम्हाला प्रेम दिलंय आणि त्यासोबतच जबाबदारीही येते. आपण ते कधीही हलक्यात घेतलं नाही पाहिजे. सर्वोत्तम काम करण्याचं कर्तव्य मानतो. मला फक्त असं वाटलं की, सर्वांनी एकत्र येऊन आपले सर्वोत्तम प्रयत्न द्यावे. हीच एकमेव चिंता होती. पण आता सर्वकाही ठीक आहे. सर्वकाही ठीक होणार होतं. आम्हाला फक्त काही फाइन-ट्युनिंगची आवश्यकता होती. शेवटी, प्रियदर्शन, अक्षय आणि सुनील हे सर्वजण क्रिएटिव्ह आहेत आणि बऱ्याच काळापासून मित्रही आहेत."

परेश रावल यांनी सायनिंग अमाऊंट परत केली 

या वर्षीच मे महिन्यात परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3' मधली एग्जिट कंफर्म केली. असंही वृत्त समोर आलेलं की, अभिनेत्यानं त्याची सायनिंग अमाऊंट 11 लाख रुपये 15 टक्के व्याजासह परत केली आहे. त्यानंतर फ्रँचायझीचे हक्क खरेदी करणाऱ्या अक्षय कुमारनंही त्याच्याविरुद्ध ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट केस दाखल केलेला. चाहत्यांपासून ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी परेशच्या 'हेरा फेरी 3'मधून बाहेर पडण्यावर निराशा व्यक्त केली.

दरम्यान, प्रियदर्शन 'हेरा फेरी 3'चं दिग्दर्शन करत आहेत आणि फिरोज नाडियाडवाला या चित्रपटाचे निर्माते आहेत. पुन्हा एकदा अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे त्रिकूट या चित्रपटात दिसणार आहे. सध्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sachin Pilgaonkar Interview: 'वयाच्या 7 व्या वर्षीच ठरवलं, मला दिग्दर्शक बनायचंय...'; सचिन पिळगांवकरांनी सांगितलेला बालपणीचा 'तो' किस्सा

महत्त्वाच्या बातम्या

Panchayat 5 OTT Release: बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
Gaurav More Hindi Webseries: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत
Bobby Deols Aashram Season 4: पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
BMC : मोठी बातमी : किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
Embed widget