Pankaj Tripathi : अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सध्या त्याच्या मैं अटल हूं (Main Atal Hoon) या सिनेमामुळे चर्चत आहे. मैं अटल हूं (Main Atal Hoon) हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जीवनावर आधारित सिनेमामध्ये त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. "अटलजींची भूमिका निभवताना मनात फार भिती होती. मात्र, ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी अतिशय चांगल्या प्रतिकिया दिल्या आहेत, त्यामुळे भीती काही प्रमाणात कमी झाली आहे", असे अभिनेता पंकज त्रिपाठीने स्पष्ट केलय. दरम्यान या वेळी बोलताना पंकज त्रिपाठीने भारतीय मतदारांबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
भारतीय मतदारांबाबत काय म्हणाला पंकज त्रिपाठी? (Pankaj Tripathi)
निवडणुकीच्या पूर्वी हा सिनेमा रिलीज होणे हा एक योगायोग आहे का? असा सवाल पंकज त्रिपाठीला विचारण्यात आला होता. यावर बोलताना पंकज त्रिपाठी म्हणाला, असा प्रश्न विचारणे म्हणजे भारतीय मतदारांच्या विवेकाला कमी आहे आणि तो सिनेमाने प्रभावित होईल, असे म्हटल्याप्रमाणे आहे. बाकी इतरांनी स्वत:च्या इच्छेप्रमाणे अर्थ काढावेत. हा सिनेमा 25 डिसंबर रोजी रिलीज होणार होता. मात्र, सिनेमातील वीएफएक्सवर काम करणे बाकी होते. त्यामुळे रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.
वाजपेयी यांची भूमिका का स्वीकारली?
पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) म्हणाला, अटल बिहारी वाजपेयी यांचे चरित्र विराट आहे. त्यांची भूमिका कशी निभावणार? यावर मी विचार केला होता. निर्माते म्हणाले तुम्ही ही भूमिका केली नाहीत तर आम्ही सिनेमाच बनवणार नाही. त्यानंतर मी काही पुस्तक घेऊन दिल्लीला गेलो. तिथे मी फुकरेसाठी शूटींग करणार होतो. माझ्याकडे दिल्ली विद्यापीठातील एक प्राध्यापक आणि पत्रकार आले होते. त्यांनी माझ्याकडील पुस्तक पाहिली आणि प्रतिक्रिया दिली की, तुम्हीच हे करु शकता. त्यानंतर मी सिनेमा करण्यासाठी पूर्णपणे तयार झालो, असा खुलासा पंकज त्रिपाठीने केला.
सेन्सॉर बोर्डाकडून काय सांगण्यात आले?
सेन्सॉर बोर्डाबाबत पंकज त्रिपाठीला (Pankaj Tripathi) प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पंकज त्रिपाठी म्हणाला की, याबाबतचे सर्व काम दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी पाहिले आहे. माझ्याकडून चांगल्या पद्धतीने भूमिका निभावण्यात यावी, यासाठी 100 टक्के प्रयत्न केले. आता त्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात? हे माझ्या हातात नाही.
आम्ही अटलजींना व्यक्ती आणि राजकारणी अशा दोन्ही स्वरुपात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बटेश्वर येथील मुलगा पुढे जाऊन अटल बिहारी वाजपेयी कसा बनतो? हा संपूर्ण प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. कोणताही सिनेमा चांगला किंवा वाईट नसतो. हा केवळ दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा दृष्टिकोणाचा विषय आहे, असेही पंकज त्रिपाठीने (Pankaj Tripathi) स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या