Panchayat 4 Big Update:  काही वर्षांपूर्वी आलेल्या 'पंचायत' (Panchayat) ही सिरिज अनेकांच्या पसंतीस पडली आहे. त्यामुळे जेव्हा कधी बेस्ट सिरिजचा उल्लेख केला जातो, तेव्हा पंचायतचं नाव आवर्जुन घेतलं जातं. या सिरिजशी सामन्य माणसं खूप कनेक्ट झालीत. या सिरिजमध्ये उत्तर प्रदेशातील फुलेरा गावाची गोष्ट दाखवण्यात आलीये. पंचायत या सीरिजचा पहिला पार्ट हा 2020 मध्ये आला होता. त्यानंतर 2022 मध्ये या सीरिजचा दुसरा पार्ट आला. आता 28 मे रोजी 'पंचायत-3' (Panchayat Season 3 Release Date) रिलीज होणार आहे. प्राईमवर (Amazon Prime Video) ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधी पंचायत-4 विषयी देखील मोठी अपडेट समोर आली आहे. 


जिथे 'पंचायत-3' ची गोष्ट संपणार तिथेच 'पंचायत-4' ची गोष्ट सुरु होणार असल्याची अपडेट याच सिरिजमधील एका महत्त्वाच्या पात्राने दिली आहे. या सीरिजमध्ये विकास ही भूमिका साकारणाऱ्या चंदन रॉय याने 'पंचायत-4' येणार असल्याचंही सांगितलं आहे. त्यामुळे ही सीरिज तिसऱ्या सीजनमध्येच थांबणार नसून त्याची गोष्टी पुढेही चालू राहणार असल्याचं आता म्हटलं जात आहे. 


पंचायतसंदर्भात मोठी अपडेट समोर


टिव्ही 9 डिजीटलला दिलेल्या मुलाखतीमध्ये चंदन रॉयने यावर भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, आता पंचायत-3चा ट्रेलर येईल. त्यामध्ये तुम्हाला कळेलच की या सीरिजची गोष्ट कशी आणि काय आहे. यामध्ये ज्यामध्ये दारूगोळा, बारूद, आग, आणि बरंच काही असणार आहे. तसेच जिथे पंचायत-3 संपेल तिथूनच पंचायत-4 सुरु होणार आहे. 


पुढे त्याने म्हटलं की, पंचायत-3मध्ये अनेक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण पंचायत-4 मध्ये प्रेक्षकांना अशा काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत, ज्याची अपेक्षा प्रेक्षकांनी पंचायतकडून केली नव्हती. 2020 मध्ये या सीरिजचा पहिला पार्ट आला, 2022 मध्ये दुसरा पार्ट आला आणि आता 2024 मध्ये सीरिजचा तिसरा पार्ट येणार आहे. पण पंचायत-4 साठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे. त्याचप्रमाणे मेकर्सने देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करुन ठेवला आहे. 


'पंचायत-3' या दिवशी येणार भेटीला


 बहुप्रतिक्षीत वेब सीरिज 'पंचायत 3' ची (Panchayat Season 3 Release) रिलीज डेट अखेर जाहीर झाली आहे. मागील काही दिवसांपासून प्राईम व्हिडीओकडून (Prime Video) 'पंचायत 3'च्या रिलीज डेटबाबत हिंट दिली जात होती. त्यानंतर आज रिलीज डेटवरून पडदा उघडण्यात आला आहे. त्यामुळे फुलेरा गावातील मंडळींना भेटण्यास उत्सुक असणाऱ्या प्रेक्षकांना आता फक्त काही दिवसच प्रतीक्षा करावी लागणार आहे. 




ही बातमी वाचा : 


Panchayat Season 3 release Date : 'पंचायत 3' ची रिलीज डेट अखेर जाहीर; 'या' दिवशी भेटायला येणार फुलेरा गावचे सचिवजी!