Panchayat Season 3 Release Date :   बहुप्रतिक्षीत वेब सीरिज 'पंचायत 3' ची (Panchayat Season 3 Release) रिलीज डेट अखेर जाहीर झाली आहे. मागील काही दिवसांपासून प्राईम व्हिडीओकडून (Prime Video) 'पंचायत 3'च्या रिलीज डेटबाबत हिंट दिली जात होती. त्यानंतर आज रिलीज डेटवरून पडदा उघडण्यात आला आहे. त्यामुळे फुलेरा गावातील मंडळींना भेटण्यास उत्सुक असणाऱ्या प्रेक्षकांना आता फक्त काही दिवसच प्रतीक्षा करावी लागणार आहे. 


एका खेडेगावात घडणाऱ्या घटनांभोवती वेब सीरिजचे कथानक गुंफण्यात आले आहे. या वेब सीरिजचा पहिला सीझन 2020 मध्ये रिलीज झाला होता. या सीझनला तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 2022 मध्ये दुसरा सीझन आला. या दुसऱ्या सीझनलाही तुफान प्रतिसाद मिळाला. आता 'पंचायत'चा तिसरा सीझन (Panchayat Season 3) येणार आहे. या सीझनमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे. 


'पंचायत 3' रिलीज डेटची घोषणा






प्राईम व्हिडीओने आज आपल्या सोशल मीडिया हँडलवर 'पंचायत 3'ची रिलीज डेट जाहीर केली आहे. ही वेब सीरिज आता 28 मे 2024 पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 







पंचायत 3' मध्ये सचिवजींची बदली कुठं?


'पंचायत 3' च्या टीझरमध्ये फुलेराचे गावचे लाडके सचिवजी अभिषेकची त्रिपाठी (जितेंद्र कुमार) बदली दुसऱ्या गावात करण्यात येते. अभिषेकच्या जागी गावचा जावई असलेल्या गणेशची फुलेरा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक म्हणून येतो. 


युजर्स काय म्हणाले?


मागील काही दिवसांपासून या वेब सीरिजची उत्सुकता ताणली गेली होती. प्राईम व्हिडीओनेदेखील युजर्सना कोडं देत तारीख कोणती असेल असा प्रश्न विचारला. त्यानंतर आज 'पंचायत 3' ची रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर यु्जर्सकडून भन्नाट कमेंट्स येऊ लागल्या आहेत.  एका युजर्सने म्हटले की,  'देख रहे हो बिनोद, कैसे रिलीज डेट बताया जा रहा है।' तर, एका युजरने अतिशय वाईट प्रमोशननंतर रिलीज डेट जाहीर केली. काही युजर्सकडून मिर्झापूर 3 ची रिलीज डेट जाहीर करण्याची मागणी केली.