Panchayat Season 3 Updates :  प्राइम व्हिडिओची प्रसिद्ध वेब सीरिज 'पंचायत'चा (Panchayat) तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्यापूर्वी सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी निर्माते सर्व काही करत आहेत. अलीकडेच, नवीन पोस्टसह, शोचा ट्रेलर 17 मे रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु ट्रेलरपेक्षा अधिक चर्चा होती की नवीन पोस्टरमधून सचिव अभिषेक त्रिपाठी म्हणजेच जितेंद्र कुमार गायब आहे. त्यातच आता पुढील सचिवाच्या शोधासाठी फुलेरा गावात एक रिक्त जागा जाहीर करण्यात आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण सविस्तर जाणून घेऊयात. 


प्राइम व्हिडिओने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिले आहे, 'रिक्त जागा. फुलेरा गाव नवीन सचिवाच्या शोधात आहे. फुलेराचे पुढचे सचिव होणार का? तुमचा CV पाठवा. या पोस्टमध्ये पंचायत कार्यालयाची भिंत आणि खुर्चीही दिसते. एका एपिसोडमध्ये अभिषेक त्रिपाठी म्हणजेच जितेंद्र कुमार त्याच्या खुर्ची घेऊन येतो. या खुर्चीवरुन बराच वादही सुरु होतो. त्यावेळी गावात एक लग्न असते. या लग्नाची वरात पंचायत कार्यालयात असते. त्यावेळी गावचा जावई गणेश ही खुर्ची पाहतो आणि घेऊन जातो.






फुलेरा गावात नवीन सचीव?


रिपोर्ट्सनुसार, या सीझनमध्ये गणेश म्हणजेच अभिनेता आसिफ खान फुलेरा गावाचा नवा सचिव असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच नवीन पोस्टमध्ये फुलेरा गावातली लोकंही समोरासमोर असल्याचं पाहायला मिळतंय. एका बाजूला मंजू देवी,  प्रधान जी, प्रल्हाद काका आणि बिनोद आणि सान्विका, तर दुसऱ्या बाजूला बनारकस, पत्नी क्रांती, आमदार आणि इतर लोकं आहेत. पण या पोस्टरमधून  जितेंद्र कुमार गायब आहे. 



कधी रिलीज होणार पंचायत-3?


'पंचायत 3' ही वेब सीरिज 28 मे रोजी प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर 17 मे रोजी लाँच होणार आहे. या ट्रेलरमधून  'पंचायत-3'मध्ये कोणत्या गमतीजमती असतील याचा अंदाज  प्रेक्षकांना येणार आहे. आता सचिवजी या सीझनमध्ये असणार की नाही याचा उलगडाही या ट्रेलरमध्ये होण्याची शक्यता आहे. 


ही बातमी वाचा : 


Panchayat Season 3 Updates :'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवे पोस्टर पाहून चाहते संतापले