Panchayat Season 3 : ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमवर व्हिडीओवर 'पंचायत' (Panchayat Season 3) या वेब सीरिजला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. 'पंचायत' वेब सीरिजचे दोन सीझन आल्यानंतर आता तिसऱ्या सीझनची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 'पंचायत'च्या तिसऱ्या सीझनच्या (Panchayat Season 3) रिलीज घोषणा करण्यात आली आहे. आता या रिलीजपूर्वीच 'पंचायत-3' च्या नव्या पोस्टरद्वारे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्याचे काम सुरू आहे. मात्र, नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या पोस्टरमुळे चाहत्यांचा संताप झाला आहे.


पंचायत-3 मध्ये नसणार हा अभिनेता?


पंचायत-3  या वेब सीरिजचा नवे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये फुलेरा गावातील लोक दोन गटात विभागले असल्याचे दिसत आहे. दोन्ही गट एकमेकांवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत.  एकीकडे  या पोस्टरमध्ये ट्रेलरच्या तारखेने लोकांची उत्सुकता वाढवली आहे. तर, दुसरीकडे या पोस्टरमधून एक अभिनेता दिसत नसल्याने चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. नवीन पोस्टरमध्ये प्रधान जी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह दिसत आहेत, परंतु सचिवजी म्हणजेच जीतू भैय्या पोस्टरमधून गायब आहेत. त्यावरून लोक संतापले आणि सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत. 










युजर्सकडून नाराजी व्यक्त 


पंचायत 3 चे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना लोक जीतू भैय्या दिसत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. यावर कमेंट करताना एका युजरने म्हटले की, 'आमचे सचिवजी कुठे आहे?' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'जर सचिवजी नाहीत तर ही वेब सीरिज बकवास असते. तिसऱ्या युजरने म्हटले की,'जीतूजीची बदली झाली आहे का?' एका युजरने देख रहा है ना विनोद या गाजलेल्या संवादाचा वापर करत सचिवजी यांनाच गायब केले असल्याचे म्हटले आहे.


कधी रिलीज होणार पंचायत-3?


'पंचायत 3' ही वेब सीरिज 28 मे रोजी प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर 17 मे रोजी लाँच होणार आहे. या ट्रेलरमधून  'पंचायत-3'मध्ये कोणत्या गमतीजमती असतील याचा अंदाज  प्रेक्षकांना येणार आहे. आता सचिवजी या सीझनमध्ये असणार की नाही याचा उलगडाही या ट्रेलरमध्ये होण्याची शक्यता आहे.