एक्स्प्लोर

तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष

नुकतेच या चित्रपटाचे पहिलेवहिले टीजर पोस्टर आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे  .

Pach Futacha Bachchan:नाटकाचं रुपांतर चित्रपटात होण्याच्या आजवरच्या यशस्वी परंपरेत आता आणखी एका सिनेमाचे नाव जोडले जाणार आहे. एकपात्री प्रायोगिक नाटक असलेली ‘पाच फुटाचा बच्चन’ ही गोष्ट आता चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिलेवहिले टीजर पोस्टर आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे  .

कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज् यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिश दाते, किशोर कदम, आशय कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील, विनोद वणवे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. अभिषेक शेटे यांचं छायांकन, सौरभ प्रभुदेसाई यांचं  संकलन, शंतनु-दिनेश यांचं ध्वनी आरेखन आहे. तसेच निरंजन पेडगावकर यांनी संगीत दिलेले असून प्रदीप आवटे यांनी गीतलेखन केलेले आहे. या सगळ्यात ‘पाच फुटाचा बच्चन’ नक्की कोण साकारणार, हे मात्र अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

‘पाच फुटाचा बच्चन’ सिनेमाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता 

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या टीजर पोस्टरनंतर ‘पाच फुटाचा बच्चन’ या सिनेमाच्या आकर्षक चित्रशीर्षकाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या टीजर पोस्टरवरुन हा चित्रपट विठ्ठल भक्ती, वारकरी संप्रदाय, कीर्तन परंपरा याच्याशी निगडीत आहे असे दिसत आहे. एक तरुण कीर्तनकार मुलगी आणि तिच्याभोवती रिंगण करून कीर्तनात दंग झालेले वारकरी असे हे चित्र आहे. या पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे.

दिग्दर्शक कौस्तुभ देशपांडे म्हणाले, तीन वर्षांपूर्वी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘पाच फुटाचा बच्चन’या एकपात्री नाटकाचा प्रयोग झाला. पहिल्याच प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतरच्या प्रयोगांनाही तुफान प्रतिसाद मिळत राहिला. मुंबई-पुण्यासह गावोगावी या नाटकाचे प्रयोग केले. अनेक पुरस्कारांमध्ये नामांकन, पुरस्कार मिळाले, महोत्सवांमध्ये नाटकाचं सादरीकरण झालं. नाटकावर येत असलेल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह वाढत होता. या नाटकावर चित्रपट होऊ शकतो याची जाणीव होत होती. निर्माते राहुल कर्णिक यांनी या नाटकाचा चित्रपट करण्याच्या कल्पनेला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे नाटकाचे प्रयोग योग्य टप्प्यावर थांबवून आम्ही चित्रपट निर्मितीच्या कामाला सुरुवात केली . अस्सल मातीतली कथा भव्य स्वरुपात पडद्यावर चित्रित करण्यासाठी लागणारा  तांत्रिक संघ तयार करून सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, खडकवासला, पुणे आणि कोल्हापूर इथे गेल्या वर्षभरात चित्रीकरण केलेले आहे. आता ‘पाच फुटाचा बच्चन’ प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
Sankarshan Karhade Son: स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
Marathi Actor Hemant Dhome: 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
OTT Suspense Thriller: 8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Embed widget