Rochak Kohli New Song : 'विक्की डोनर' चित्रपटातील 'पानी दा रंग' आणि 'अय्यारी' चित्रपटातील 'ले डुबा' या गाण्यांसाठी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रोचक कोहलीचं नवीन गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. "पहली बार मिले" असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. 


इनग्रुव्स म्यूजिक ग्रुप, ही एक म्यूजिक डिस्ट्रीब्यूशन, मार्केटिंग आणि  टेक्नोलॉजी साठी जागतिक आघाडीवर असलेली कंपनी आहे. या कंपनीने ग्लोबल डिस्ट्रीब्यूशन करारासाठी R Music लेबल ला साइन केले आहे. या नवीन कराराअंतर्गत रोचक कोहलीची पहिली रिलीज "पहली बार मिले" हा ट्रॅक आहे, जो 14 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आला. रोचक कोहली च्या 'पहली बार मिले' या नवीन गाण्यात, भारतातील अरेंज मॅरेजच्या परंपरेला चंचल आणि कोमल रचनेतून दर्शविण्यात आले आहे. हे गाणे आपल्याला प्रेम, स्वीकार आणि आनंद असा अनुभव देतो. या गाण्यात एक नवविवाहित जोडपे टॉय ट्रेनमध्ये बसून हिमालयाचे सौंदर्य न्याहाळत प्रेमाच्या प्रवासात मग्न झालेले दिसत आहेत. 


रोचक कोहली म्हणाला...


या संदर्भात रोचक कोहली म्हणाला, "आपल्या देशात प्रतिभेचा सागर आहे" आणि आर म्युझिकच्या साहाय्याने संगीत कलाकारांची पुढची पिढी विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हा प्रवास आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो सुरू करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.


इनग्रुव्सचे, इंडिया कंट्री मॅनेजर, अमित शर्मा म्हणतात, "रोचक हा स्वतःच एक स्टार आहे. त्याची R Music साठी एक खरी दृष्टी आहे. ज्याचा एक भाग असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे." या नवीन गाण्याद्वारे आपल्या प्रेक्षकांना लेबलची ओळख करून देण्याची ही एक उत्तम संधी आहे. 


इनग्रुव्स म्यूजिक ग्रुप, ही एक म्यूजिक डिस्ट्रीब्यूशन, मार्केटिंग आणि टेक्नोलॉजीसाठी जागतिक आघाडीवर असलेली कंपनी आहे. या कंपनीने ग्लोबल डिस्ट्रीब्यूशन करारासाठी R Music लेबलला साइन केले आहे. तसेच प्रसिद्ध संगीतकार आणि चित्रपट निर्माता रोचक कोहली हे R Music चे संस्थापक आणि CEO आहेत.


हे गाणे  R Music द्वारे सादर करण्यात आले आहे. याचे दिग्दर्शन गौतम गोविंद यांनी केले आहे. गाण्याचे बोल गुरप्रीत सैनी यांनी लिहिले असून पियुष अग्निहोत्री याचे निर्माता आहेत.


पाहा व्हिडीओ : 



 


महत्त्वाच्या बातम्या : 


Critics Choice Awards 2023: आरआरआरच्या यशाची घोडदौड सुरुच; क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्समध्ये मिळाली 5 नामांकने