Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीसाठी सुरु असलेल्या प्रचाराचा तोफा उद्या थंडावणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून गावगाड्यावर निवडणूक रणधुमाळी जोरात सुरु आहे. त्यामुळे मतदारांपर्यत अगदी तो शेतात का असला, तरी चालेल पण त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी पायाला भिंगरी लावून कंबर कसली आहे. प्रत्यक्षात प्रचार उद्या थांबणार असल्याने पडद्यामागील हालचालींना मोठा वेग येणार आहे. गेला आठवडाभरापसून कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District Gram Panchayat Election) प्रचार घरोघरी जाऊन सुरु आहे.


मतदारांची प्रत्यक्ष भेट होत नसेल तर फोन, मेसेजद्वारे मतदारापर्यंत भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोशल मीडिया सुद्धा प्रभावीपणे वापरण्यात येत आहे. दुसरीकडे सरपंचपदासाठी थेट निवडणूक होत असल्याने गावांमध्ये प्रचंड टोकाची ईर्ष्या निर्माण झाली आहे. साम, दाम, दंडचा वापर करण्यात येत आहे. जवळपास रात्री दहा वाजेपर्यंत उमेदवारांकडून प्रचार केला जात आहे. विरोधकांवरही विशेष लक्ष ठेवले जात आहे. दुसरीकडे, पंचायतींमध्ये 50 टक्के महिलाराज असल्याने प्रचारामध्ये प्रत्येक गावात महिलांचा सुद्धा मोठा सहभाग दिसून येत आहे. पुरुष उमेदवारांच्या तोडीने प्रचार करताना दिसून येत आहेत. 


23 लोकनियुक्त सरपंच आणि 43 ग्रामपंचायती बिनविरोध 


दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 23 लोकनियुक्त सरपंच आणि 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सरपंचपदासाठी 1 हजार 456 उमेदवारांनी माघार घेतल्याने सरपंचपदासाठी 1 हजार 193 उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 7 हजार 362 उमेदवारांनी माघार घेतल्याने 8 हजार 995 उमेदवार रिंगणात आहेत.   


चार तालुक्यांमध्ये एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही 


दरम्यान, जिल्ह्यातील 12 पैकी 8 तालुक्यात 43 ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात यश आले असले, तरी 4 तालुक्यांमध्ये एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. करवीर, कागल, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. 


अन्य तालुक्यात काय स्थिती?



  • चंदगड तालुक्यात 40 पैकी 3 बिनविरोध

  • पन्हाळा तालुक्यात 50 पैकी 10 बिनविरोध

  • गडहिंग्लज तालुक्यात 34 पैकी 4 बिनविरोध

  • गगनबावडा तालुक्यात 21 पैकी 3 बिनविरोध

  • राधानगरी तालुक्यात 66 पैकी 8 बिनविरोध

  • आजरा तालुक्यात 36 पैकी 5 बिनविरोध

  • शाहुवाडी तालुक्यात 49 पैकी 5 बिनविरोध

  • भुदरगड तालुक्यात 44 पैकी 5 बिनविरोध


कोणत्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला?



  • करवीर - काँग्रेस आमदार सतेज पाटील, आ. पी. एन पाटील आणि माजी आमदार चंद्रदीप नरके

  • पन्हाळा आणि शाहूवाडी - माजी आमदार सत्यजित पाटील, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे

  • कोल्हापूर दक्षिण- आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक

  • राधानगरी-भुदरगड - शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार के पी पाटील

  • कागल- राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, भाजप नेते समरजितसिंह घाडगे आणि खासदार संजय मंडलिक

  • शिरोळ - शिंदे गटाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, स्वाभिमानीचे राजू शेट्टी

  • हातकणंगले- अपक्ष आमदार प्रकाश आवाडे, शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने

  • चंदगड - राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील, शिवसेनेचे संग्राम कुपेकर 


इतर महत्वाच्या बातम्या