एक्स्प्लोर

OTT webseries: एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच

नुकतीच चर्चेत आलेली 'द पिरॅमिड स्कीम' असो किंवा 'जामताडा : सबका नंबर आएगा', या आठवड्यात बिंज-वॉच करण्यासाठी या वेब सीरिज नक्की पाहू शकता.

OTT Scam Thriller: स्कॅम, फसवणूक आणि धक्कादायक सत्यावर आधारित वेब सीरिज पाहायला अनेकांना आवडतात. अशा कथा केवळ मनोरंजनच करत नाहीत, तर आपल्या आसपास घडणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांचीही जाणीव करून देतात. भारतीय OTT वर अशा अनेक दमदार वेब सीरिज उपलब्ध आहेत, ज्या प्रेक्षकांना स्कॅमच्या अंधाऱ्या जगात घेऊन जातात. नुकतीच चर्चेत आलेली 'द पिरॅमिड स्कीम' असो किंवा 'जामताडा : सबका नंबर आएगा', या आठवड्यात बिंज-वॉच करण्यासाठी या वेब सीरिज नक्की पाहू शकता.

1. द पिरॅमिड स्कीम

'द पिरॅमिड स्कीम' ही वेब सीरिज झटपट श्रीमंत होण्याच्या मोहाची भीषण किंमत कशी चुकवावी लागते याचं उत्तम उदाहरण आहे. गोल्डी नावाचा एक तरुण आर्थिक अडचणींमुळे MLM (मल्टी-लेव्हल मार्केटिंग) स्कॅमच्या जाळ्यात अडकतो. पैशांच्या लालसेत सुरू झालेला त्याचा प्रवास पुढे मोठ्या संकटात बदलतो आणि त्याचा फटका त्याच्या कुटुंबासह अनेकांना बसतो. या मालिकेत शेखर सुमन, रणवीर शौरी, परमवीर सिंह चीमा, आशीष राघव, अंजन श्रीवास्तव आणि अल्फिया जाफरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

कुठे पाहाल?

OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून आजकाल गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशा स्कॅमचं वास्तव समजून घेण्यासाठी ही मालिका उपयुक्त ठरू शकते.

2. बॅड बॉय बिलेनियर्स: इंडिया

'बॅड बॉय बिलियनेअर्स : इंडिया' ही एक माहितीपट (डॉक्यु-सीरिज) आहे. भारतातील काही गाजलेल्या उद्योगपतींच्या यशापासून ते त्यांच्या घसरणीपर्यंतचा प्रवास या मालिकेत दाखवण्यात आला आहे. खऱ्या आर्काइव्ह फुटेज आणि मुलाखतींच्या माध्यमातून लालसा, आर्थिक फसवणूक आणि भ्रष्टाचाराची कहाणी यात उलगडली जाते.

कुठे पाहाल?

ही डॉक्यु-सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.देशातील मोठमोठ्या आर्थिक घोटाळ्यांमागील सत्य आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींच्या कहाण्या जाणून घेण्यासाठी ही मालिका पाहण्यासारखी आहे.

3. जामताडा : सबका नंबर आएगा

'जामताडा : सबका नंबर आएगा' ही दोन सीझनची लोकप्रिय क्राइम थ्रिलर आहे. तांत्रिक ज्ञान असलेले काही शाळा सोडलेले तरुण एका छोट्याशा गावातून फिशिंग स्कॅम चालवतात. जसजसा हा घोटाळा वाढत जातो, तसतसे भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे संपूर्ण प्रकरण आणखी गुंतागुंतीचं होतं.

कुठे पाहाल?

ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.फोन कॉल, OTP आणि ऑनलाइन फसवणुकीचे वाढते प्रकार कसे घडतात, यामागचं वास्तव जाणून घ्यायचं असेल तर ही मालिका नक्की पाहा.

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
Tiger Shroff Mother Reaction: टायगरवर हल्ला करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या, एक आरोपी तर Rapido रायडर; लेकासाठी आईची 3 शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाल्या...
टायगरवर हल्ला करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या, एक आरोपी तर Rapido रायडर; लेकासाठी आईची 3 शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Tiger Shroff Car Firing Live Updates: टायगर श्रॉफवर हल्ला, आता काय काय घडतंय?, LIVE अपडेट्स, एका क्लिकवर
Tiger Shroff Car Firing Live Updates: टायगर श्रॉफवर हल्ला, आता काय काय घडतंय?, LIVE अपडेट्स, एका क्लिकवर
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारतींच्या पोस्टने खळबळ, श्रेयवादावरुन नाराजी, नेमकं काय घडलं?
टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारतींच्या पोस्टने खळबळ, श्रेयवादावरुन नाराजी, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Embed widget