एक्स्प्लोर

OTT Subscription: एकीकडे प्रीमियम कंटेंट, दुसरीकडे स्वस्त प्लॅन! नेटफ्लिक्स घ्यावं की जिओ हॉटस्टार? कोणत्या OTT ला प्रेक्षकांची पसंती? आकडे समोर...

कोणता ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांची पहिली पसंती ठरतोय? हिंदी ते हॉलीवूड चित्रपटांमध्ये कोण मारतंय बाजी? जाणून घ्या सविस्तर...

OTT Subscription: मोबाईल हातात घेतला की पहिला प्रश्न पडतो,आज काय बघायचं? एका बाजूला थिएटरमध्ये धडाकेबाज चित्रपट रिलीज होतायत, तर दुसऱ्या बाजूला ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वेब सीरिज आणि सिनेमांचा अक्षरशः पाऊस पडतोय. नेटफ्लिक्स, जिओ हॉटस्टार, प्राइम व्हिडीओ यांसारख्या प्लॅटफॉर्म्सनी प्रेक्षकांना इतके पर्याय दिलेत की नेमकं कोणाचं सब्सक्रिप्शन घ्यावं, हेच अनेकांना समजेनासं झालं आहे. पण या सगळ्या गोंधळात आता एक मोठी आकडेवारी समोर आली आहे. कोणता ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांची पहिली पसंती ठरतोय? हिंदी ते हॉलीवूड चित्रपटांमध्ये कोण मारतंय बाजी? जाणून घ्या सविस्तर...

वेबसिरीज नव्हे चित्रपटांसाठीच सबस्क्रीप्शन!

वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटीवर रिलीज होत असले तरी थिएटरमधील गर्दी कमी झालेली नाही. आजही प्रेक्षक कुटुंबीय आणि मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणं अधिक पसंत करतात. ऑरमॅक्सच्या अहवालानुसार, लोक वेब सीरिजपेक्षा चित्रपटांसाठीच जास्त प्रमाणात ओटीटीचं सब्सक्रिप्शन घेतात. 126 मोठ्या चित्रपटांचा डेटा तपासण्यात आला. हे चित्रपट आधी थिएटरमध्ये रिलीज झाले आणि नंतर ओटीटीवर आले. या चित्रपटांना थिएटरमध्ये 10 लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिलं. त्यामुळे थिएटरचं आकर्षण अजूनही टिकून असल्याचं स्पष्ट होतं.

कुठल्या ओटीटीवर किती चित्रपट रिलीज ?

मोठ्या चित्रपटांच्या ओटीटी रिलीजमध्ये नेटफ्लिक्सने बाजी मारली आहे. आकडेवारीनुसार, 36 टक्के मोठे चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होतात. त्यानंतर 21 टक्के चित्रपट जिओ हॉटस्टारवर तर 18 टक्के चित्रपट प्राइम व्हिडीओवर रिलीज होतात. उर्वरित चित्रपट इतर प्लॅटफॉर्म्सवर येतात.

हिंदी चित्रपटांमध्येही कोणाचे वर्चस्व?

फक्त हिंदी चित्रपटांचा विचार केला तरी नेटफ्लिक्स आघाडीवर आहे. तब्बल 57 टक्के हिंदी चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होतात. त्यानंतर 26 टक्के चित्रपटांसह प्राइम व्हिडीओ दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिओ हॉटस्टार तिसऱ्या स्थानावर आहे.

विदेशी चित्रपटांसाठी कशाला पहिली पसंती?

आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या बाबतीत मात्र जिओ हॉटस्टारनं मोठी बाजी मारली आहे. 2025 मध्ये भारतात 10 लाखांहून अधिक प्रेक्षकांनी थिएटरमध्ये पाहिलेल्या 13 विदेशी चित्रपटांचा डेटा तपासण्यात आला. त्यापैकी 12 चित्रपटांचं विश्लेषण करण्यात आलं आणि त्यातील 10 चित्रपट जिओ हॉटस्टारवर उपलब्ध असल्याचं समोर आलं. म्हणजेच या विभागात तब्बल 83 टक्के हिस्सा जिओ हॉटस्टारकडे आहे. यामुळे भारतीय चित्रपटांसाठी नेटफ्लिक्स तर विदेशी चित्रपटांसाठी जिओ हॉटस्टार हा प्रेक्षकांचा सर्वाधिक पसंतीचा ओटीटी प्लॅटफॉर्म ठरत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget