एक्स्प्लोर

OTT Crime Thriller Webseries: करिश्मा कपूरच्या थरारक क्राईम सिरिजची प्रचंड चर्चा; 1 मिनिट 51 सेकंदाचा ट्रेलर पाहून अंगावर काटे येतील

मर्डर मुबारक’नंतर जवळपास दोन वर्षांनी करिश्मा कपूर पुन्हा एका दमदार भूमिकेत परतली आहे.‘मेंटलहुड’नंतरचा हा तिचा दुसरा OTT प्रोजेक्ट आहे.

OTT Crime Thriller Webseries: रात्रीचा काळोख… कोलकात्याच्या ओस पडलेल्या रस्त्यांवर अचानक सायरनचा आवाज घुमतो… आणि पुढच्या क्षणी सुरू होतो एका खुनाचा थरारक तपास. अभिनेत्री करिश्मा कपूरच्या आगामी वेबसीरिजचा 1 मिनिट 51 सेकंदांचा थरारक ट्रेलर समोर आलाय.  काही मिनिटांतच सोशल मीडियावर या सिरीजची जोरदार चर्चा सुरू झाली. पण हा फक्त आणखी एक क्राइम थ्रिलर नाही… कारण या कथेत प्रत्येक चेहऱ्यामागे एक रहस्य दडलंय आणि प्रत्येक संवादानंतर संशय आणखी गडद होत जातो. (Karishma Kapoor Webseries)

करिश्माचा आतापर्यंतचा सर्वात डार्क अवतार?

करिष्मा कपूरच्या 'ब्राउन' वेब सिरीजचा ट्रेलर सध्या प्रचंड चर्चेत आहे. ट्रेलरमध्ये करिश्मा कपूर ‘रीटा ब्राउन’ या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसते. पण ही नेहमीसारखी धाडसी, सगळं नियंत्रणात ठेवणारी ऑफिसर नाही. तिच्या डोळ्यांमध्ये झोप नाही… चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसतो… आणि भूतकाळातील काही जखमा अजूनही तिचा पाठलाग करत असल्याची जाणीव सतत होते. (Brown Webseries)

एका हाय-प्रोफाइल टीनएजर मर्डर केसचा तपास करताना रीटा एका अशा जाळ्यात अडकत जाते, जिथे सत्य आणि खोटं यामधली रेषाच पुसट होत जाते. दरम्यान शहरात आणखी एक खून होतो… आणि केस अधिकच भयावह बनते. ट्रेलरमधील एक संवाद अक्षरशः अंगावर काटा आणतो -“जो वाचवतो तो देव… जो मारतो तो दानव… पण देव आणि दानव यांच्या मध्ये माणूस कुठे आहे?”

प्रत्येक पात्र संशयित… कोणावर विश्वास ठेवणार?

जिशू सेनगुप्ता एका मानसोपचारतज्ज्ञाच्या भूमिकेत दिसतो. तो शांत आहे… संयमी आहे… पण त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी लपवल्याची भावना सतत जाणवते. तर सूर्या शर्मा रीटाचा ज्युनियर अधिकारी बनून तपासात मदत करताना दिसतो. सोनी राजदान यांनी साकारलेली रीटाची आई कथेला भावनिक वळण देते. पण या सगळ्यांच्या मध्ये एक प्रश्न सतत डोक्यात राहतो, खरा गुन्हेगार कोण?

ट्रेलरमध्ये सतत धुराच्या वलयात हरवलेली रीटा, गोळ्या घेणं, मद्यपान, तुटत चाललेलं मानसिक संतुलन… हे सगळं पाहताना ही फक्त मर्डर मिस्ट्री नाही, तर एका स्त्रीच्या आतल्या अंधाराची कहाणी असल्याचं जाणवत राहतं.

दोन वर्षांनंतर करिश्माचं दमदार पुनरागमन

‘मर्डर मुबारक’नंतर जवळपास दोन वर्षांनी करिश्मा कपूर पुन्हा एका दमदार भूमिकेत परतली आहे.‘मेंटलहुड’नंतरचा हा तिचा दुसरा OTT प्रोजेक्ट असून, यावेळी ती पूर्णपणे वेगळ्या आणि धक्कादायक अवतारात दिसणार आहे. ‘ब्राउन’ ही सीरिज अभीक बरुआ यांच्या ‘सिटी ऑफ डेथ’ या पुस्तकावर आधारित असून, 5 जूनपासून ZEE5 वर स्ट्रीम होणार आहे. पण ट्रेलर पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्की या शहरात प्रत्येक जण काहीतरी लपवत आहे… आणि सत्य समोर आलं, तर अनेकांचे चेहरे कायमचे बदलून जाणार आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget