मुंबई : तंत्रज्ञानामुळे आपलं जीवन खूपच सोपं झालं आहे. इंटरनेटमुळे जग जणू मुठीत आलं आहे. मनोरंजनासाठी चित्रपट पाहायचा असेल तर, चित्रपटगृहात जाण्याची गरजही भासत नाही. कारण ओटीटीमुळे तेही खूप सोपं झालं आहे. ओटीटीमुळे (OTT Platform) कोणताही चित्रपट आपण घरबसल्या पाहू शकतो. त्यामुळे थिएटरमध्ये जाण्याऐवजी घरी आरामात बसून कुटुंबातील सदस्यांसह OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहू शकतो. वेगवेगळ्या वेब सीरीजचाही ओटीटीवर आनंद घेता येतो. त्यामुळेच बॉलिवूडपासून ते साऊथ इंडस्ट्रीपर्यंतचे चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात.
ओटीटी प्लॅटफॉर्मची कमाई कशी होते?
कोरोनाच्या काळात मनोरंजन विश्वाला ओटीटीने (OTT) तारलं. तेव्हापासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित होण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. अजूनही हा ट्रेंड सुरूच आहे. थिएटरमध्ये आपण तिकीट खरेदी करतो आणि चित्रपट पाहायला जातो, ज्यामुळे चित्रपटांची कमाई होते. पण OTT वर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातून कमाई नेमकी कशप्रकारे होते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? याबाबतीत आज सविस्तर जाणून घ्या.
ओटीटी रिलीजमधून चित्रपट निर्मात्यांची करोडोंची कमाई
ओटीटी हे एक प्लॅटफॉवर आहे जिथे तुम्ही इंटरनेटद्वारे मोबाईल ॲप किंवा टीव्ही ॲपवर चित्रपट आणि वेब सीरीज पाहू शकता. या OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट किंवा वेब सीरीज पाहण्यासाठी तुम्हाला काही पैसे मोजावे लागतात. तुम्हाला ओटीटी सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. निर्माते ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचे हक्क म्हणजेच कॉपीराईट चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर OTT प्लॅटफॉर्मवर विकतात. हे कॉपीराईट विकून निर्माते कोट्यवधी रुपये कमावतात. यासाठी निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म यांच्यात एक करार आहे आणि मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर, संपूर्ण चित्रपट ओटीटीवर एकाच वेळी प्रदर्शित होतो.
थेट OTT रिलीझमधून कमाई
जे चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात, ते युजर आणि स्क्रिन एंगेजमेंट यावर पैसे कमवतात. ओटीटीवर प्रदर्शित झालेला चित्रपट दररोज किती वेळा स्ट्रीम होतो आणि किती वापरकर्ते चित्रपट पाहतात यावर ओटीटी प्लॅटफॉर्म कमाई करतात.
OTT प्लॅटफॉर्म पैसे कसे कमवतात?
ओटीटी प्लॅटफॉर्मवर पैसे कमावण्याचे तीन मार्ग आहेत. यामधील एक म्हणजे मागणीनुसार ट्रान्जॅक्शन व्हिडीओ ऑन डिमांड, ज्यामध्ये वापरकर्ते प्लॅटफॉर्मवरून काहीतरी डाउनलोड करण्यासाठी पैसे देतात. दुसरा मार्ग आहे सबस्क्रिप्शन व्हिडीओ ऑन डिमांड, यामध्ये यूजर मासिक सबस्क्रिप्शन घेऊन कंटेंट पाहतात. तिसरे म्हणजे, जाहिरातींवर आधारित व्हिडीओ, यामध्ये कंटेट विनामूल्य आहे, पण त्यामध्ये येणाऱ्या जाहिराती वगळल्या जाऊ शकत नाहीत, या जाहिरातींमधून ओटीटी प्लॅटफॉर्मची कमाई होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :