Relationship Tips :  हिंदू धर्मात लग्न करण्यापूर्वी त्या दोन व्यक्तींच्या कुंडली ज्योतिषींना दाखवून (Relationship Tips)  जुळवल्या जातात. जन्मकुंडलीमध्ये ज्योतिषी ग्रह, नक्षत्रे इत्यादी गोष्टी बघून गुणांची मोजणी करतात आणि कुंडली जुळवतात. याच्या आधारे त्या जोडीचे भविष्य वर्तवले जात असते. पण, बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की लग्न करण्यापूर्वी राशी देखील जुळल्या पाहिजे. प्रत्येक राशीचा स्वत:चा स्वभाव असतो. दोन राशीचे  जुळले की कोणत्याही अडचणीवर तुम्ही सहज मात करू शकतात. ज्यांचे आपापसात कधीही जुळत नाही, त्यांनी लग्न करण्यापूर्वी योग्य विचार करणे फार महत्वाचे आहे. त्याचबरोबर तुमची व तुमच्या जोडीदाराची रास कोणती? हे सुद्धा पाहा.  काही जोड्यांच्या बाबतीत हे तंतोतंत जुळतं. त्यांची जोडी अगदी स्वर्गात बांधल्यासारखीच असते.  आज आपण अशा  जाणून राशींबद्दल जाणून घेऊया.... 


तूळ आणि सिंह (Libra and Leo) 


या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे ते मनमिळावू असतात. लोकांना भेटणे, लोकांशी बोलणे हा त्यांचा छंद असतो.  या दोन राशींना मनमोकळेपणाने व्यक्त व्हायला आवडते.  या दोन राशीचे लग्न झाले तर ते दीर्घकाळ टीकू शकते आणि त्यांना लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणता येतो. 

मेष  आणि कुंभ (Aries and Aquarius) 


या दोन्ही राशीचे लोकांचे लोक जीवनसाथी झाले तर ते बहुतांशी उत्तम निर्णय घेऊ शकतात. या दोघांमध्ये प्रेम आणि रोमान्स खचून भरलेला असतो. अर्थात ही दोन्ही राशींची लोक सृजनात्मक असतात. या राशीचे लोक स्वत:चे छंद जोपासतात आणि नेहमीचा आपल्या जोडीदाराला स्पेस देणे  पसंत करतात. 


मेष आणि कर्क (Aries and Cancer) 


मेष  राशीचे लोक बहादूर आणि निडर असतात. तर कर्क राशीचे लोक हे ऊर्जावान असतात.  हे आपल्या जोडीदाराला ही ऊर्जावान ठेवतात. त्यामुळे यांची जोडी उत्तम मानली जाते. 


मेष आणि मीन (Aries and Pisces) 


मेष आणि मीन राशीच्या लोकांचे आपआपसात स्नेहाचे संबंध बनतात. ऐकमेकांसोबत हे कर्तव्यनिष्ठ आणि एकनिष्ठ असतात. मेष ही  रास स्वभावाने थोडी तापट असते पण त्यांचे लग्न जल तत्त्वाच्या राशीशी म्हणजे शांत राशीसोबत झाल्यास त्यांचे लग्न दीर्घकाळ टिकते.  संसारात एकाने आग तर दुसऱ्याने पाणी व्हायचे असते 


वृषभ आणि कर्क ( Taurus and Cancer) 


या राशीचे लोक एकमेकांना आदर देणारे असतात. ते ऐकमेकांची प्रशंसा देखील करत असतात. वृषभ आणि कर्क राशीत उत्तम ताळमेळ असतो. कर्क राशीचे लोक ही खऱ्या मनाची असतात तर वृषभ राशीचे लोक ही दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमीच तत्पर असतात. दोघेही कुटुंबचे महत्त्व जाणून असतात.  


वृषभ आणि मकर (Taurus and Capricorn) 


या राशीचे लोक प्रेमाने आणि समजुतीने राहतात. वृषभ  राशीचे लोक मकर राशीच्या  लोकांच्या  कामाची प्रशंसा करत असतात तर मकर राशीचे लोक उदारतेला आणि समजूतदारपणाला पसंत करतात


धनु  आणि सिंह (Sagittarius and Leo) 


धनु राशीचे लोक आपल्या मनाचे करतत कोणत्याही प्रकारच्या बनावटीपासून ते दूर राहतात. हास्य विनोद करणे यांना आवडते. तसेच मेष राशीचे लोक सामाजिकदृष्ट्या सक्रिय असतात आणि वास्वात जगणे त्यांना आवडते.  सिंह राशीचे धनु राशीच्या लोकांशी चांगले पटते. सिंह राशीचे  स्वभावाने हट्टी असतात पण धनु राशीचे लोकांना यांचा आत्मविश्वास आवडतो. त्यामुळे हे दोघे समस्येचे समाधान काढण्याच यशस्वी होतात. 


कन्या  आणि मकर (Virgo and Capricorn) 


  कन्या राशीचे लोक काळजी करणारे असतात. ज्याने त्यांचा स्वभाव अंतर्मुख होऊन जातो. पण कन्या राशीचे लोक बोलतात तेव्हा ते मनमोकळेपणाने बोलतात, आणि त्यांचा हाच स्वभाव मकर राशीच्या लोकांना  आकर्षित करतो


वृश्चिक आणि  कर्क (Scorpio and Cancer) 


दोन्ही जलतत्त्वाच्या राशी आहेत. या राशीचे लोक संवेदनशील असतात.ऐकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात.


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हे ही वाचा :


Vastu Tips : लग्नाला विलंब, प्रगतीत अडथळे? घरात ठेवलेल्या 'या' वस्तू तर नाहीत ना जबाबदार?