Oscars 2024 Live Updates : सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म ठरली '20 डेज इन मारियुपोल'; 'ऑस्कर 2024' सोहळ्यातील प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर

Oscars 2024 Live Updates : हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत असंख्य कलाकार आतुरतेने या सोहळ्याची वाट पाहत असतात. यंदाच्या ऑस्कर (Oscar 2024) पुरस्कार सोहळ्याची भारतीयांमध्येही फार उत्सुकता आहे.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्कLast Updated: 11 Mar 2024 09:04 AM

पार्श्वभूमी

Oscars 2024 Live Updates : जगभरातील सिनेप्रेमी ऑस्कर पुरस्कार (Oscar Award 2024) सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. अवघ्या काही तासांत या सोहळ्याच्या विजेत्यांची घोषणा होणार आहे. 'ऑस्कर 2024' (Oscar 2024)...More

Oscars 2024 on Nitin Desai : ऑस्कर सोहळ्यात देसाईंना आदरांजली

Oscars 2024 on Nitin Desai : दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना ऑस्कर चित्रपट सोहळ्यात आदरांजली वाहण्यात आली. इन मेमोरियम नावाच्या सत्रात जगभरातील यशस्वी दिवंगत कलावंतांचं स्मरण केलं जातं. त्यामध्ये यंदा नितीन देसाई यांचा देखील उल्लेख करण्यात आला. 2 ऑगस्ट रोजी देसाई यांनी स्वतःचं जीवन संपवलं होतं. लगान हा चित्रपट 2002 साली ऑस्करला गेला होता. त्याचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई होते. स्लमडॉग मिलियोनेर या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रपटाचं कला दिग्दर्शन देखील त्यांनीच केलं होतं.