Oscars 2022 : नुकताच 94 वा अॅकॅडमी पुरस्कार सोहळा म्हणजेच ऑस्कर अवॉर्ड (Oscars 2022) सोहळा  पार पडला. यंदा ऑस्करच्या शर्यतीमध्ये भारताच्या 'रायटिंग विथ फायर'  'Writing With Fire' डॉक्यूमेंट्री फिल्मला बेस्ट डॉक्यूमेंट्री फीचर फिल्म या कॅटेगिरीसाठी नामांकन मिळाले होते. पण अमेरिकेच्या 'Summer of Soul' या डॉक्यूमेंट्री फिल्मनं हा पुरस्कार पटकावला आहे. 'रायटिंग विथ फायर'  या डोक्यूमेंट्री फिल्मनं अनेक अंतरराष्ट्रीय पुरस्कार पटवले आहेत. पण ही फिल्म ऑस्करच्या शर्यती बाहेर पडली आहे. 


सुष्मित घोष आणि रिंटू थॉमस यांनी 'रायटिंग विथ फायर' या डॉक्यूमेंट्रीची निर्मीती केली आहे. 'खबर लहरिया' या वर्तमानपत्रावर या डॉक्यूमेंट्रीचे कथानक आधारित आहे. समर ऑफ सोल ही हार्लेम सांस्कृतिक महोत्सवावर आधारित आहे. हार्लेम सांस्कृतिक महोत्सव हा हार्लेम माउंट मॉरिस पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. हा महोत्सव सहा आठवडे सुरू होता. स्टीव्ही वंडर, द स्टेपल सिंगर्स, महालिया जॅक्सन, द 5थ डायमेंशन, नीना सिमोन, ग्लॅडिस नाइट आणि पिप्स यांसारख्या प्रसिद्ध अमेरिकन पॉप स्टार्सनं या  महोत्सवात सहभाग घेतला होता. या डॉक्यूमेंट्रीमध्ये  पॉप कल्चरबाबत माहिती देण्यात आली आहे. 
  
ऑस्करमध्ये 'ड्युन'चा ‘सिक्सर’
ऑस्कर या पुरस्कार सोहळ्यात ‘ड्युन’चित्रपटानं आतापर्यंत 11 श्रेणींमध्ये 6 ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत. बेस्ट फिल्म एडिटिंग,बेस्ट ओरिजनल स्कोअर, बेस्ट प्रॉडक्शन डिझाईन,बेस्ट साऊंड, बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स आणि बेस्ट सिनेमॅटोग्राफी या कॅटेगिरीमधील पुरस्कार 'ड्युन' चित्रपटानं पटकावले आहेत. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha