Resul Pookutty on RRR : ऑस्कर विजेता साउंड डिझायनर रसूल पोकुट्टी (Resul Pookutty) हा सध्या त्याच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. ट्वीटमध्ये रसूल पोकुट्टी हा एसएस राजामौली यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटाला 'समलैगिंक लव्ह स्टोरी' असं म्हणाला आहे. त्यामुळे काही लोक सध्या रसूल पोकुट्टीला ट्रोल करत आहेत. रसूल पोकुट्टीच्या ट्वीटला नुकतच बाहुबली चित्रपटाचे निर्माते शोबू यारलागड्डा (Shobu Yarlagadda) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. शोबू यारलागड्डा यांनी ट्वीट करत लिहिलं, 'समलैंगिक लव्ह स्टोरी ही वाईट गोष्ट आहे का?'
तीन जुलै रोजी मुनीश भारद्वाज यांनी आरआरआर या चित्रपटाबाबत ट्वीट शेअर केलं होतं. या ट्वीटमध्ये मुनीश भारद्वाज यांनी लिहिलं, 'काल रात्री तीस मिनिटांचा RRR नावाचा कचरा पाहिला.' या ट्वीटला रिप्लाय करत रसूल पोकुट्टीनं लिहिलं, 'समलैगिंक लव्ह स्टोरी' त्यानंतर दुसऱ्या ट्वीटमध्ये रसूल पोकुट्टीनं लिहिलं, या चित्रपटामध्ये आलिया ही एक प्रॉप आहे.'
बाहुबलीच्या निर्मात्यांनी दिलं उत्तर
रसूल पोकुट्टीच्या या ट्वीटला बाहुबली चित्रपटाचे निर्माते शोबू यारलागड्डा यांनी रिप्लाय देत सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'मला असं वाटत नाही की आरआरआर हा चित्रपट ही समलैगिंक लव्ह स्टोरी आहे. जरी असं असलं तरी समलैगिंक लव्ह स्टोरी असणं ही चुकीची गोष्ट आहे का? तुम्ही असं कसं म्हणू शकता. तुमच्यासारखा व्यक्ती इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो याबद्दल निराशा वाटते. '
रसूल पोकुट्टीचं स्पष्टीकरण
शोबू यारलागड्डा यांनी केलेल्या ट्वीटला रिप्लाय करत रसूल पोकुट्टीनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'मी तुमच्यासोबत सहमत आहे. कारण समलैगिंक लव्ह स्टोरी असणं ही चुकीची गोष्ट नाहीये. मी फक्त माझ्या मित्रासोत मज्जा करत होतो. तुम्ही या गोष्टी सिरियसली घेऊ नका. मला कोणालाही त्रास द्यायचा नाहीये. '
आरआरआर चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात राम चरण, ज्युनियर एनटीआर, आलिया भट आणि अजय देवगण या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
हेही वाचा: