RRR Beats Hollywood Films : एस.एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित 'आरआरआर' (RRR) सिनेमा दिवसेंदिवस नव-नवे रेकॉर्ड करत आहे. या सिनेमात ज्यूनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. जगभरात या सिनेमाने 1115 कोटींची कमाई केली आहे. आता या सिनेमाने हॉलिवूडच्या अनेक सिनेमांना मागे टाकलं आहे.
'आरआरआर' सिनेमाचे भारतासह जगभरातून कौतुक होत आहे. या सिनेमाने आता टॉप गन मेवरिक (Top Gun Maverick) आणि बॅटमॅन (Batman) या सिनेमांना मागे टाकलं आहे. हॉलीवुड क्रिटिक्स असोसिएन तर्फे दिला जाणारा 'एवरीवेअर एवरीवेअर ऑल अॅट वन्स' हा पुरस्कार यंदा 'आरआरआर' सिनेमाला मिळाला आहे. एचसीएने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
राजमौलींच्या 'आरआरआर' सिनेमाचे जगभरातून कौतुक होत आहे. यूएसए टुडेच्या रिपोर्टनुसार, 'आरआरआर' हा सिनेमा 2022 मधील सर्वश्रेष्ठ सिनेमांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या सिनेमाने हॉलिवूडच्या 'द बॅटमॅन' आणि 'टॉप गन मेवरिक' या सिनेमांना मागे टाकलं आहे. तसेच सर्वोत्कृष्ट अॅक्शन सिनेमाचा मानदेखील या सिनेमाला मिळाला आहे.
एसएस राजामौलींच्या 'आरआरआर' सिनेमाने 'बाहुबली 2'चादेखील रेकॉर्ड मोडला आहे. हा सिनेमा सिनेमागृहात 24 मार्च 2022 रोजी रिलीज झाला होता. आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. अजुनही 'आरआरआर'ची क्रेझ संपलेली नाही. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
संबंधित बातम्या