Oscar Awards 2023 Live: Oscars 2023 : 'ऑस्कर 2023'मध्ये भारताने रचला इतिहास; जाणून घ्या 'ऑस्कर 2023' च्या प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

95 वा अकादमी पुरस्कार (Oscar Awards 2023) लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटरमध्ये  पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 13 Mar 2023 08:05 AM
Oscars 2023 : 'ऑस्कर 2023'मध्ये 'Avatar: The Way of Water'ने पटकावला सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्टचा पुरस्कार

Oscars 2023 : 'ऑस्कर 2023'मध्ये 'अवतार: द वे ऑफ वॉटर' 'Avatar: The Way of Water' या सिनेमाने सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्टचा पुरस्कार पटकावला आहे.





Oscars 2023 : बेस्ट ओरिजनल स्कोर या कॅटेगरीमध्ये 'ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट'ने मारली बाजी

Oscars 2023 :  बेस्ट ओरिजनल स्कोर या कॅटेगरीमध्ये 'ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट'ने बाजी मारली आहे.





Oscar Awards 2023: भारतासाठी अभिमानाचा क्षण; ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटूवर परफॉर्मन्स, प्रेक्षकांकडून 'स्टँडिंग ओव्हेशन'!

Oscar Awards 2023: 95 वा ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळा  लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये सुरु आहे. जगभरातील लोकांचे लक्ष लागले आहे. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा भारतीयांसाठी खास आहे. एसएस राजामौलीच्या 'आरआरआर' (RRR) या सुपरहिट सिनेमातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्याला 'ओरिजनल सॉन्ग' या कॅटेगरीमध्ये ऑस्कर पुरस्काराचे नामांकन मिळालं आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात गायक काळ भैरव (Kaala Bhairava) आणि राहुल सिपलीगुंज (Rahul Sipligunj) यांनी यांनी नाटू नाटू हे गाणं गायलं. या दोघांच्या परफॉर्मन्सनं ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची मनं जिंकली.













 















अभिमानास्पद! भारताच्या 'द एलिफेंट व्हिस्परर्स' नं पटकावला ऑस्कर

भारताच्या द एलिफंट व्हिस्परर्स या लघुपटानं ऑस्कर पुरस्कार  पटकावला आहे. 





Oscars 2023 Live : 'ब्लॅक पँथर'च्या रुथ कार्टरने पटकावला सर्वोत्कृष्ट वेशभूषाकाराचा पुरस्कार

Oscars 2023 Live : सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार 'वाकांडा फॉरएव्हर'साठी रुथ कार्टरला मिळाला.





Oscars 2023 Live : सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म ठरली 'अॅन आयरिश गुडबाय'

Oscars 2023 Live : सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म या ऑस्कर श्रेणीत 'आयरिश गुडबाय' या शॉर्ट फ्लिमला पुरस्कार मिळाला आहे.





Oscar 2023 Live: सर्वोत्कृष्ट हेअर अँड मेकअप कॅटेगिरीतील ऑस्कर 'द व्हेल' नं पटकावला

Oscar 2023 Live:  सर्वोत्कृष्ट हेअर अँड मेकअप कॅटेगिरीतील ऑस्कर 'द व्हेल' नं पटकावला आहे. 





Oscar 2023 Live: सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर जेम्स फ्रेंड यांनी पटकावला

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर जेम्स फ्रेंड यांना 'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' या चित्रपटासाठी देण्यात आला आहे.





Oscar 2023 Live: डॉक्युमेंटरी फीचर फिल्म कॅटेगरीमधील ऑस्कर पुरस्कार 'Navalny' या डॉक्युमेंटरीनं पटकावला

Oscar 2023 Live:  डॉक्युमेंटरी फीचर फिल्म कॅटेगरीमधील ऑस्कर 'Navalny' या डॉक्युमेंटरीनं पटकावला आहे. आर दॅट ब्रेथ्स या भारतीय माहितीपटालाही याच श्रेणीत नामांकन मिळाले होते. पण या 'Navalny' या डॉक्युमेंटरीनं  ऑस्कर पटकावला आहे. 



Oscar 2023 Live: 'अॅन आयरिश गुडबाय' ठरली सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म

Oscar 2023 Live: 'अॅन आयरिश गुडबाय' या शॉर्ट फिल्मनं सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीमधील ऑस्कर जिंकला आहे. 





सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ठरली जेमी ली कर्टिस

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ठरली जेमी ली कर्टिस





Oscar 2023 Live: अभिनेता के हुई क्वाननं पटकावला ऑस्कर; ठरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

Oscar 2023 Live: अभिनेता के हुई क्वान (Ke Huy Quan) नं 95 वा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. त्यानं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या श्रेणीमधील पुरस्कार पटकावला आहे. 





पार्श्वभूमी

Oscar Awards 2023 Live:  95 व्या ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळ्याकडे जगभरातील लोकांचे लक्ष लागले आहे. 95 वा अकादमी पुरस्कार  लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटरमध्ये  पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भारतात ऑस्कर 2023 हा पुरस्कार सोहळा तुम्ही एबीसी नेटवर्क केबल, सीलिंग टीव्ही, हुलू प्लस लाइव्ह टीव्ही, यूट्यूब टीव्ही आणि फुबो टीव्हीवर पाहू शकता. ऑस्करच्या ट्विटर हँडलवर तुम्ही या पुरस्कार सोहळ्याचे अपडेट्स पाहू शकता. तसेच या पुरस्कार सोहळ्याचे अपडेट्स तुम्हाला एबीपी माझाच्या वेबसाईटवर देखील मिळतील. 


यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा भारतीयांसाठी खास आहे. भारतीयांच्या नजरा 95 व्या ऑस्कर पुरस्कारावर (ऑस्कर 2023) खिळल्या आहेत. कारण साऊथ चित्रपटसृष्टीतील दिग्गज चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटातील 'नाटू नाटू'ला  (Naatu Naatu) ऑस्कर 2023 साठी बेस्ट ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीमध्ये नामांकन मिळाले आहे.


'ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणचा समावेश


'ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणसह ड्वेन जॉनसन, मायकल बी जॉर्डन, रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, ट्रॉय कोत्सुर, जेनिफर कोनेली, सॅम्युअल एल जॅक्सन, मेलिसा कॅककार्थी, जो सलदाना, डॉनी येन, जोनाथन मेजर्स आणि क्वेस्टलोव या सेलिब्रिटींचाही समावेश आहे. 


ऑस्कर 2023 नॉमिनेशन्सची संपूर्ण यादी
बेस्ट पिक्चर (सर्वोत्कृष्ट चित्रपट)


ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, द बँशीज ऑफ इनिशेरिन, एल्विस, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स, द फॅबलमॅन्स, टार, वीमेन टॉकिंग, ट्रँगल ऑफ सॅडनेस


बेस्ट डायरेक्शन (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन)


मार्टिन मॅकडोना (द बँशीज ऑफ इनिशेरिन), डॅनियल क्वान आणि डॅनियल, शायनर्ट (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स), स्टीवन स्पीलबर्ग (द फॅबलमॅन्स), टॉड फील्ड (टार), रबेन ओस्टलँड (ट्रँगल ऑफ सॅडनेस)


बेस्ट ॲक्ट्रेस इन अ लीडिंग रोल (मुख्य अभिनेत्री)


केट ब्लँचेट (टार), ॲना डे आर्म्स (ब्लॉन्ड), अँड्रिया राइजबोरो (टू लेजली), मिशेल विलियम्स (द फॅबलमॅन्स), मिशेल येओ (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स)


बेस्ट ॲक्टर इन अ लीडिंग रोल (मुख्य अभिनेता)


ऑस्टिन बटलर (एल्विस), कॉलिन फेरेल (द बँशीज ऑफ इनिशेरिन), ब्रँडन फ्रेजर (द ह्वेल), पॉल मॅसकल (आफ्टरसन), बिल नाय (लिविंग)


बेस्ट विजुअल इफेक्ट्स


ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, द बॅटमॅन, ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर, टॉप गन: मॅवरिक


बेस्ट सिनेमॅटोग्राफी


ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, एल्विस, टार, अम्पायर ऑफ लाइट, बार्डे, फॉल्स क्रॉनिकल ऑफ ए हँडफुल ऑफ थ्रथ्स


बेस्ट फिल्म एडिटिंग


द बँशीज ऑफ इनिशेरिन, एल्विस, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स, टार, टॉप गन: मॅवरिक


बेस्ट ॲक्ट्रेस इन सपोर्टिंग रोल (सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री)


एंजेला बेसेट (ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर ), हॉन्ग चाउ (द ह्वेल), केरी कोंडोन (द बँशीज ऑफ इनिशेरिन), जेमी ली कर्टिस (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स), स्टेफनी सू (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स)


बेस्ट कॉस्च्युम डिझाइन


रूथ कार्टर (ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर ), मेरी जोफ्रेस (बेबीलॉन), कॅथरीन मार्टिन (एल्विस), जेनी बीवन (मिस हेरिस गोज टू पेरिस)


बेस्ट साऊंड
ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, द बॅटमॅन, एल्विस, टॉप गन: मॅवरिक


बेस्ट ओरिजनल स्कोअर


ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, बेबीलॉन, द बँशीज ऑफ इनिशेरिन, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स, द फॅबलमॅन्स


बेस्ट ॲडाप्टेड स्क्रीनप्ले


ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, ग्लास अन्यन: अ नाइव्स आउट मिस्ट्री, लिविंग, टॉप गन: मॅवरिक, वीमेन टॉकिंग


बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले
द बँशीज ऑफ इनिशेरिन, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वंस, द फॅबलमॅन्स, टार, ट्रँगल ऑफ सॅडनेस


बेस्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म


ॲन आयरिश गुडबाय, लवालू, ले प्युपिल्स, नाइट राइड, द रेड सूटकेस


बेस्ट ॲनिमेटिड शॉर्ट फिल्म


द बॉय, द मोल, द फॉक्स अँड द हॉर्स, द फ्लाइंग सेलर, आइस मर्चेंट्स, माय इअर ऑफ डिक्स, ॲन ऑस्ट्रिच टोल्ड मी द वर्ल्ड इज फेक अँड आय थींक आय बिलिव इट


बेस्ट ॲक्टर इन सपोर्टिंग रोल (सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता)


ब्रँडन ग्लीसन (द बँशीज ऑफ इनिशेरिन), ब्रायन टीरी हेनरी (कॉजवे), जुड हर्श (द फॅबलमॅन्स), बॅरी कियोगन (द बँशीज ऑफ इनिशेरिन), के ह्यू क्वान (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स)


बेस्ट ओरिजनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं)


अप्लॉज (टेल इट लाइक अ वुमेन), होल्ड माय हँड (टॉप गन: मॅवरिक), लिफ्ट मी अप (ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर), दिस इज अ लाइफ (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स), नाटू नाटू (आरआरआर)


बेस्ट डाक्युमेंट्री फीचर फिल्म


ऑल दॅट ब्रीद्स, ऑल द ब्युटी अँड द ब्लडशेड, फायर ऑफ लव्ह, अ हाऊस मेड ऑफ स्प्लिंटर्स, नवल्नी


बेस्ट डाक्युमेंट्री शॉर्ट फिल्म


द एलिफेंट व्हिस्परर्स, हॉलआउट, हाउ डू यू मेजर अ इअर, द मार्था मिचेल इफेक्ट, स्ट्रेंजर ॲट द गेट


बेस्ट इंटरनेशनल फीचर फिल्म


ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अर्जेंटीना, 1985, क्लोज, ईयो, द क्वाइट गर्ल


बेस्ट ॲनिमेटिड फीचर फिल्म


गुइलेर्मो डेल टोरो का पिनोचियो, मार्सेल द शेल विद शूज ऑन, पुस इन बूट्स: द लास्ट विश, द सी बीस्ट, टर्निंग रेड


बेस्ट मेकअप अँड हेयरस्टाइलिंग


द बॅटमॅन, ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर, एल्विस, द ह्वेल


बेस्ट प्रॉडक्शन डिझाइन


ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, बेबीलॉन, एल्विस, द फॅबलमॅन्स

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.