एक्स्प्लोर

Netflix वर दहशत माजवण्यासाठी सज्ज झाला 'ऑब्सेशन'; ब्लॉकबस्टर हॉरर थ्रिलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

अखेर ही प्रतीक्षा संपणार असून चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे.

Obsession OTT Release Date: हॉलीवूडमधील ब्लॉकबस्टर हॉरर चित्रपट 'ऑब्सेशन' (Obsession) आता थिएटरनंतर ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट नेमका कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, याची माहिती समोर आली आहे. 2026 मधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या हॉरर चित्रपटांपैकी एक असलेला 'ऑब्सेशन' आता मोठ्या पडद्यावर यशस्वी ठरल्यानंतर ओटीटीवर स्ट्रीमिंगसाठी सज्ज झाला आहे. भारतातील सिनेमागृहांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता त्याच्या ओटीटी रिलीजची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर ही प्रतीक्षा संपणार असून चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे.

2026 मधील गाजलेला हॉरर थ्रिलर

'ऑब्सेशन' हा एक सायकोलॉजिकल हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध यूट्यूबर करी बार्कर (Curry Barker) यांनी केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली असून एडिटिंगची जबाबदारीही सांभाळली आहे. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटात कोणताही मोठा स्टार नाही. इंडी नवारेट, मायकेल जॉन्सन आणि मेगन लॉलेस यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

भयावह दृश्यांनी वाढतो थरार

या चित्रपटाची कथा आणि सादरीकरण प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारं आहे. सुमारे 1 तास 49 मिनिटांच्या या चित्रपटात मोठमोठे जंप स्केअर्स किंवा भीतीदायक संवाद नसतानाही प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांना अस्वस्थ करून सोडतो. कलाकारांच्या अभिनयातील भाव आणि वातावरणनिर्मितीमुळे चित्रपटाचा थरार अधिक प्रभावी ठरतो.

काय आहे चित्रपटाची कथा?

चित्रपटाची कथा बिअर आणि निक्की या दोन पात्रांभोवती फिरते. बिअरचं निक्कीवर प्रेम असतं आणि तीही त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करावं, अशी त्याची इच्छा असते. एके दिवशी त्याला 'वन विश विलो' नावाचं रहस्यमय झाड सापडतं. त्याच्याकडे तो अशी इच्छा व्यक्त करतो की निक्कीने फक्त त्याच्यावरच प्रेम करावं. इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तो त्या झाडाची फांदी मोडतो आणि त्याची इच्छा खरीही ठरते. मात्र, या इच्छेची त्याला अत्यंत भीषण किंमत मोजावी लागते. त्यानंतर घटनांना भयावह वळण मिळतं.

बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई

प्रदर्शनानंतर 'ऑब्सेशन'ची जगभरात मोठी चर्चा झाली. या चित्रपटाने जगभरात सुमारे 409 दशलक्ष डॉलरची कमाई केली असून भारतीय चलनात ही रक्कम जवळपास 3,900 कोटी रुपये इतकी आहे.

 'ऑब्सेशन'ची OTT रिलीज डेट

थिएटरमध्ये यश मिळवल्यानंतर आता हा चित्रपट Netflixवर स्ट्रीम होणार आहे. IMDb वर 8 रेटिंग मिळालेला हा हॉरर थ्रिलर 17 नोव्हेंबर 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ही माझ्याकडून अधिकृत नोटीस समजा..' मृणाल ठाकूरचा संताप; पोस्ट करत दिला कारवाईचा इशारा; नेमकं घडलं काय?
'ही माझ्याकडून अधिकृत नोटीस समजा..' मृणाल ठाकूरचा संताप; पोस्ट करत दिला कारवाईचा इशारा; नेमकं घडलं काय?
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
Salman Khan Bigg Boss 20: 'बिग बॉस'ची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली, धमाकेदार टीझर पाहिलात? सलमान खानचा 'करण अर्जून अवतार', म्हणाला...
'बिग बॉस'ची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली, धमाकेदार टीझर पाहिलात? सलमान खानचा 'करण अर्जून अवतार', म्हणाला...
Udayanidhi Stalin On Trisha Krishnan Thalapathy Vijay Relation: त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Embed widget