India's Most Watched Film: सध्या संपूर्ण भारतात 'पुष्पा 2: द रूल'चं (Pushpa 2: The Rule) वारं आहे. सगळीकडे फक्त पुष्पाचीच चर्चा आहे. एवढंच काय तर, पुष्पाच्या कमाईच्या आकड्यांनी तर सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) चित्रपटाची कमाई 1500 कोटींच्या पुढे गेली आहे. पण, आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटाबाबत सांगणार आहोत. ज्याचं नाव ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. या चित्रपटाचं नाव आहे, 'शोले'. देशातील सिनेप्रेमींना हा चित्रपट विसरणं अशक्य आहे.
धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, जया बच्चन आणि संजीव कुमार स्टारर चित्रपट शोले रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केला होता. 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या शोलेची 25 कोटी तिकिटं विकली गेली होती आणि भारतीय सिनेमाच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांच्या यादीत त्याचा आजही आवर्जुन समावेश केला जातो.
रिलीज होताच, जोरात आपटलेला 'शोले'
15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेल्या शोले चित्रपटाला पुढील वर्षी (2025) सहा दशकं पूर्ण होतील, पण चित्रपटातील प्रत्येक दृश्य, संवाद, गाणं आणि त्यातील लोकप्रिय पात्रं आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. सुरुवातीला या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि समीक्षकांनीही चित्रपटावर टीका केली होती, पण चित्रपटातील अविस्मरणीय पात्रं आणि त्यातील संवादांमुळे प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाण्यास भाग पाडलं. यातील गब्बरच्या 'कितने आदमी है' या डायलॉगनं प्रेक्षकांना आकर्षित केलं.
25 कोटी तिकीटं विक्रीचा विक्रम आजवर फक्त 'शोले'च्याच नावावर
शोले सहा वर्ष थिएटरमध्ये चालला आणि भारतात 15 कोटी तिकिटं विकली गेली. तसेच, शोलेच्या पुन्हा रिलीजच्या वेळी भारतात 3 कोटी तिकिटं विकली गेली होती. जर आपण जगभरात पाहिलं तर, शोले सर्वाधिक पाहिला गेला तो, रशियामध्ये. जिथे चित्रपटाची 6 कोटी तिकिटं विकली गेली. याशिवाय युरोप, उत्तर अमेरिका आणि मध्य पूर्व या देशांमध्ये शोलेची प्रचंड क्रेझ होती आणि एकूणच या चित्रपटाची 25 कोटी तिकिटं विकली गेली. बाहुबली 2 आणि RRR सारखे मेगा-ब्लॉकबस्टर चित्रपट देखील शोलेच्या तिकीट विक्रीचा विक्रम मोडू शकले नाहीत.
शोलेतील पात्र, डायलॉग्स आणि सॉन्ग्स
अमिताभ बच्चन यांनी साकारलेला जय, धर्मेंद्र यांनी साकारलेला वीरू, संजीव कुमार यांनी साकारलेला ठाकूर, अमजद खान यांनी साकारलेला गब्बर, हेमा मालिनी यांनी साकारलेली बसंती आणि जया बच्चन यांनी साकारलेली राधाची भूमिका, रुपरी पडद्यावर अजरामर झाल्या. 'कितने आदमी है' या चित्रपटाच्या डायलॉगबद्दल तर आजही चर्चा होते. गब्बरचा आणखी एक डायलॉग आहे, कब है होली? तो आजही प्रसिद्ध आहे. त्यातल्या त्यात गब्बरचा आणखी एक डायलॉग 'ये हाथ मुझे दे दे ठाकूर' खूप प्रसिद्ध आहे. त्याचवेळी धर्मेंद्रचा डायलॉग बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना, याच्या चर्चा तर थांबता थांबत नाहीत. होली के दिन, ये दोस्ती हम नही तोडेगे, कोई हसीना जब रुठ जाती है तो, जब तक है जान आणि मेहबूबा-मेहबूबा ही सर्वच्या सर्व गाणी आजही लहानथोरांच्या ओठी अगदी सहज येतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :