Jitendra Awhad Whatsapp Viral Chat: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल होत आहे. याबाबत स्वत: जितेंद्र आव्हाड यांनी एक्स (आधीचे ट्विटर)वर पोस्ट करत सदर चॅट खोटी असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस गुन्हा देखील दाखल केला आहे. 


जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ट्विट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांचा फोटो असलेलं चॅट एक्सवर पोस्ट करत आव्हाड कशाप्रकारे समाजा समाजात तेढ निर्माण करतात हे दाखवण्याचा रुपाली ठोंबरे यांचा प्रयत्न असल्याचं दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. रुपाली ठोंबरे यांच्यासह विक्रांत फड, रेखा फड, कृष्णा धानोरकर, बिभीषण अघाव, आकाश चौरे, सौरभ आघाव यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कर नाही और डर कशाला?- जितेंद्र आव्हाड


माझी खोटी व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध मी काल बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा (एफआयआर) दाखल केला. कर नाही और डर कशाला?, असं जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करत म्हटले आहे. व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट कसा खोटा (माॅर्फ केलेला ) आहे, याची संपूर्ण माहीती मी  ट्वीटद्वारे (एक्स पोस्टद्वारे) दिली आहे. त्याचा वापर केला तर पोलिसांना, ' चौकशी सुरू आहे', हे सांगण्याचे कारणच उरणार नाही. मी स्वतःच सर्व तांत्रिक बाबी माझ्या ट्वीटमध्ये सांगितलेल्या माहितीचा वापर केला तर पोलिसांना फक्त कारवाईच करायची आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. 






व्हायरल होणाऱ्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये नेमकं काय?


उद्याचा मसाला तयार ठेव शिवराज..मी पहिली तुझी भेट घेईन, त्यानंतर मोर्चाकडे...मुंडेंविरोधात आणि वाल्या (वाल्मिक कराड) विरोधात जे जे असेल सर्व गोळा कर पैसे लागले तर मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव...तुझा फोन लागत नाहीय सकाळपासून प्रयत्न करतोय, असा मेसेज आहे. तसेच मोर्च्यात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा, पैशांची काळजी करु नका...आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे, त्याला ही संधी द्यावी, मी सांगितलं आहे, कसं काय कुणावर बोलायचं...कसा मंत्री राहतो आणि अजित (अजित पवार) याला कसा पक्षात ठेवतो ते बघू आता..असंही व्हायरल होणाऱ्या चॅटमध्ये म्हटलं आहे.






संबंधित बातमी:


'मंत्री कसा राहतो, ''अजित'' पक्षात कसा ठेवतो बघू'; जितेंद्र आव्हाडांची चॅट व्हायरल, नेमकं खरं काय?