Best Psychological Thriller Movie: सध्या प्रेक्षकांना सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट पाहायला खूप आवडतात. त्यातल्या त्यात जर पूर्ण गोंधळ उडवणारं कथानक असेल तर, मग बात काही औरच. असे चित्रपट विचार करायला भाग पाडतात. तसेच, या चित्रपटांच्या क्लायमॅक्समध्ये असा ट्विस्ट असतो की, प्रेक्षक थक्क होतात. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) असे अनेक चित्रपट आणि वेब सीरिज (Web Series) उपलब्ध आहेत, ज्या थ्रिलनं अगदी भरलेल्या आहेत आणि त्यांचं कथानक प्रेक्षकांना गुंतवून ठेवतं. त्यांच्या कहाण्या इतक्या अप्रतिम आहेत की, त्या पाहिल्यावर तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. 


सस्पेन्स आणि थ्रिलनं भरलेल्या या चित्रपटांमध्ये सायकोलॉजिकल मिस्ट्री थ्रिलरची (Psychological Mystery Thriller) वेगळी पातळी आहे. या चित्रपटांच्या कथा डोकं चक्रावणाऱ्या आहेत. आज आम्ही तुम्हाला एका सायकॉलॉजिकल मिस्ट्री थ्रिलर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो तुम्हाला तुमच्या जागेवरून हलू देणार नाही आणि शेवट असा असेल की,  नंतरही विचार करायला भाग पाडेल.


बॉलिवूड (Bollywood) आणि हॉलिवूडचे (Hollywood) अनेक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट तुम्ही सर्वांनी पाहिले असतील, पण आज आम्ही तुम्हाला ज्या सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, तो साऊथचा आहे, जो या वर्षी प्रदर्शित झाला आणि फार कमी वेळात या चित्रपटानं सर्वांची मनं जिंकली. हा चित्रपट दिनजीथ अय्याथन यांनी दिग्दर्शित केला होता आणि त्यात आसिफ अली, अपर्णा बालमुरली आणि विजयराघवन यांसारखे दिग्गज कलाकार होते.


या वर्षी सप्टेंबरमध्ये रिलीज झालेल्या 'किष्किंधा कांडम' या सायकॉलॉजिकल मिस्ट्री थ्रिलर चित्रपटाबद्दल आम्ही बोलत आहोत. चित्रपटाचं नाव 'रामायण'च्या किष्किंधा घटनेवरुन ठेवलं आहे. तिची कथा तीन हुशार आणि समजुतदार लोकांवर आधारित आहे, ज्यांचे माकडांशी संबंध असल्याचं दाखवण्यात आलं आहे. चित्रपटाची कथा अगदी थरकाप उडवून देते.






प्रभू राम आणि हनुमान यांच्या भक्ती आणि धैर्याच्या कथेची झलकही या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. 'किष्किंधा कांडम: ए टेल ऑफ थ्री वाईज मंकी' (Kishkindha Kaandam) या चित्रपटाचं शीर्षकही हे स्पष्ट करण्यात मदत करतं. एवढंच नाही तर बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करून या चित्रपटानं या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत आपलं नाव कोरलं आहे. विकिपीडियानुसार, हा मिस्ट्री थ्रिलर 7 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणि त्यानं बॉक्स ऑफिसवर 75.25 कोटी रुपयांची कमाई केली होती.


हा एक असा चित्रपट आहे, जो पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतरही तुमचं समाधान होणार नाही. या चित्रपटाची कथा तुम्हाला विचार करू शकते. इतकंच नाही तर चित्रपटाला IMDb वर खूप चांगलं रेटिंग मिळालं आहे, जे 10 पैकी 8.6 आहे. त्यामुळे हा चित्रपट किती अप्रतिम असेल, याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता. तुम्हालाही सायकॉलॉजिकल मिस्ट्री थ्रिलर चित्रपट पाहण्याची आवड असेल आणि तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल, तर तुम्ही तो OTT प्लॅटफॉर्म Hotstar वर पाहू शकता.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


OTT Upcoming Release 2025: अॅक्शन-ड्रामा अन् बरंच काही; नव्या वर्षात मनोरंजनाची मेजवानी, नुसतं एन्टरटेन्मेंट, एन्टरटेन्मेंट आणि एन्टरटेन्मेंट