निर्मिती सावंत यांचं मालिका विश्वात पुनरागमन? झी मराठीने व्हिडीओ शेअर केला, पण सस्पेन्स कायम ठेवला
Nirmiti Sawant return to the marathi serial : झी मराठीने एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यामुळे अभिनेत्री निर्मिती सावंत या मालिका विश्वात पुनरागमन करणार असल्याचा अंदाज प्रेक्षकांकडून वर्तवण्यात येतोय.

Nirmiti Sawant return to the marathi serial : टीव्ही मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत (Nirmiti Sawant) पुन्हा एकदा मालिका विश्वात पुनरागमन करणार असल्याची चर्चा रंगली आहे. झी मराठीने एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यामुळे याबाबची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, झी मराठीने संबंधित अभिनेत्रीचा चेहरा स्पष्टपणे दाखवलेला नाही. नेमकं काय घडलंय? जाणून घेऊयात...
View this post on Instagram
निर्मिती सावंत यांचं मालिका विश्वात पुनरागमन?
झी मराठीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. मात्र, हा व्हिडीओ शेअर करताना झी मराठीने "कोणीतरी खास येतंय... तुम्ही ओळखलंत का यांना ? कोणत्या मालिकेत येत असेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमधून सांगा", असं कॅप्शन दिलंय. मात्र, व्हिडीओ शेअर करताना झी मराठीने स्मार्टपणे संबंधित अभिनेत्रीचा चेहरा दाखवलेला नाही. मात्र, चाहत्यांनी हा व्हिडीओ निर्मिती सावंत यांचा असल्याचा अंदाज लावलाय. त्यामुळे निर्मिती सावंत (Nirmiti Sawant) पुन्हा एकदा मालिका विश्वात पुनरागमन करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
निर्मिती सावंत यांचे गाजलेले सिनेमे
Navra Maza Navsacha , खबरदार,Hee Porgi Kunachi, Jau Bai Jorat, Sasu Numbari Jawai Dus Numbari यांसारख्या चित्रपटांमधून निर्मिती सावंत यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. Kumari Gangubai Non Matric ही निर्मिती सावंत यांची मालिका प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरली होती. या मालिकेने निर्मिती सावंत यांना वेगळी ओळख मिळवून दिली. निर्मिती सावंत आणि पॅडी कांबळे यांच्या एकत्रित भूमिका असलेल्या कलाकृतींना प्रेक्षकांचा नेहमी उदंड प्रतिसाद मिळायचा. खबरदार सिनेमात देखील निर्मिती सावंत आणि पॅडी कांबळे एकत्र पाहायला मिळाले होते. दरम्यान, गेल्या काही वर्षात निर्मिती सावंत सिनेक्षेत्रापासून दूर असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, त्यांचं मालिका विश्वात पुनरागमन होणार असल्याच्या चर्चा पाहून चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
'माझा साखरपुडा झाला होता पण मोडला, मला मुलं हवी आहेत, पण त्यासाठी..' भाग्यश्री मोटेचं वक्तव्य


















