एक्स्प्लोर

Nikhil Chavan-Anushka Sarkate Kelvan: 'कारभारी लईभारी' फेम अनुष्का- निखिलची लगीनघाई;  भरत जाधवांसह कलाकारांनी घातलं केळवण; भन्नाट उखाणे व्हायरल

या सोहळ्यात आनंद, कौटुंबिक जिव्हाळा आणि मराठमोळ्या परंपरांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

Nikhil Chavan-Anushka Sarkate Kelvan: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी निखिल चव्हाण (Nikhil Chavan) आणि अनुष्का सरकटे (Anushka Sarkate) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नाच्या तयारीला वेग आला असतानाच त्यांच्या लग्नपूर्व सोहळ्यांनाही सुरुवात झाली आहे. नुकतेच या दोघांसाठी खास पारंपरिक केळवणाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात आनंद, कौटुंबिक जिव्हाळा आणि मराठमोळ्या परंपरांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

या खास कार्यक्रमाला अभिनेते भरत जाधव, सुधीर निंबाळकर, कमलाकर सातपुते, अभिनेत्री शर्मिला शिंदे यांच्यासह अनेक कलाकार आणि कुटुंबीय उपस्थित होते. सर्वांनी निखिल आणि अनुष्काचे औक्षण करत त्यांच्या आगामी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

दोघांच्या भन्नाट उखाण्यांनी पिकला हशा

या कार्यक्रमातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले ते दोघांचे भन्नाट उखाणे. अनुष्काने उखाणा घेताना, "लग्नसराई सुरू झाली, लवकरच दारी येणार निखिलची वरात... 'तू तू मी मी'चे पुढील प्रयोग आता होणार आमच्याच घरात," असे म्हणत सर्वांची मने जिंकली. त्यानंतर निखिलनेही आपल्या खास विनोदी अंदाजात, "भरत सरांना सांगितलं मी लग्न करतोय, तर ते म्हणाले 'सही रे सही'... अनुष्का, वचन देतो तुला कधी होणार नाही 'तू तू मी मी'," असा उखाणा घेताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. या गोड क्षणांनी रंगलेल्या केळवण सोहळ्याने निखिल आणि अनुष्काच्या लग्नाची उत्सुकता आणखी वाढवली आहे. आता चाहत्यांचे लक्ष त्यांच्या लग्नसोहळ्याकडे लागले आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shekhar Joshi (@shekhar.joshi___)

खऱ्या आयुष्यातही कारभारी लयभारी

'कारभारी लयभारी' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ही जोडी आता रिअल लाईफमध्येही नव्या नात्याची सुरुवात करणार आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नसोहळ्याबाबत चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता आहे. केळवणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येताच त्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

गेल्या अनेक महिन्यांपासून निखिल अनुष्का एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघांनीही सोशल मीडियावरून नात्याची कबुली दिली.  दोघांच्या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
Shreya Kalra Lock Upp Season 2 Winner: श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस
श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
Embed widget