New Movies Release : गेल्या काही दिवसांपासून व्हॅलेंटाईन वीक (Valentine's week) साजरा केला जातोय. हा महिना अधिक खास करण्यासाठी काही मोठ्या बॅनरचे चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा चित्रपटगृहे उघडल्यानंतर मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' 2022 मध्ये अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज'बरोबर रिलीज होणार आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रभासचा 'राधे श्याम' ते टायगर श्रॉफचा 'हिरोपंती' आणि अजय देवगणचा 'रुद्र' या सिनेमांच्या रिलीजच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. 


राधे श्याम : प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाचा व्हॅलेंटाईन स्पेशल व्हिडिओ चाहत्यांसाठी रिलीज करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये प्रभास आणि पूजाची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.



रॉकेट्री : आर माधवनच्या रॉकेट्री या चित्रपटाचे मोशन पोस्टर व्हॅलेंटाईन डेला रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट 1 जुलै 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.






 


हे सिनामिका : हे सिनामिका या तमिळ चित्रपटाची रिलीज डेट व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 3 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 


नूरानी चेहरा : नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नुपूर सेनॉन यांच्या चित्रपटाची घोषणा व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर करण्यात आली आहे. या चित्रपटातून नुपूर सेनन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 




रुद्र : अजय देवगणचा ओटीटी स्पेशल चित्रपट रुद्रचा ट्रेलरही व्हॅलेंटाईन डेला रिलीज झाला आहे. हा चित्रपट 4 मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर प्रदर्शित होणार आहे. 



हिरोपंती : टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया यांच्या हिरोपंती 2 चित्रपटाचे पोस्टरही नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha