Noorani Chehra Update : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या खास मुहूर्तावर नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि नुपूर सनॉनचा (Nupur Sanon) अनोखी प्रेमकथा असलेला चित्रपट 'नूरानी चेहरा'चे (Noorani Chehra) शूटिंग सुरू होत आहे. हा चित्रपट एक मजेदार विनोदी चित्रपट आहे, ज्याद्वारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित एका महत्त्वाच्या पैलूबद्दल लोकांना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जाईल. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज चित्रपटाच्या शूटिंगच्या घोषणेसह एक मजेदार टीझर पोस्टर रिलीज केले आहे.



अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतो की, ‘कोणी कसा दिसतो, हा त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनाचा विषय असतो. यातून लोकांना एक महत्त्वाचा संदेश जाईल की, एखाद्या व्यक्तीच्या बाह्य रूप आणि लूकवर जाऊ नका. याबद्दल प्रत्येकाची स्वतःची धारणा असते.’ नवाज म्हणतो की, ‘युरोपमध्ये लोक मला पाहून हँडसम म्हणतात, पण भारतात सौंदर्याचे प्रमाण वेगळे आहे.’ लोकांच्या मताची पर्वा न करता, तो म्हणतो की, भारतात अभिनेता म्हणून यशस्वी आणि लोकप्रिय होण्याआधी त्याला खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतु, अशा सर्व अडथळ्यांवर मात करून त्याने स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे.


 





‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी शूटिंगला सुरूवात


चित्रपटाचे दिग्दर्शक नवनीत सिंग म्हणतात की, ‘मी ज्याची कल्पना केली होती तेच घडत आहे, याचा मला खूप आनंद आहे. या चित्रपटाच्या कथेबद्दल मी खूप उत्सुक आहे आणि याचा मला आनंद आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नुपूर सनॉन यांनाही चित्रपटाची कथा आवडली आहे. हे दोघे कोणत्याही अर्थाने कपल वाटत नाहीत, पण एक कपल म्हणून मला या दोघांपेक्षा एकही चांगला अभिनेता सापडला नाही. इतकंच नाही तर शूटिंग सुरू झालं आहे. हे करण्यासाठी व्हॅलेंटाईन डेपेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही.’


'नूरानी चेहरा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी नुपूर सनॉन नवाजसोबत तिच्या पहिल्याच चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहे. नूर आणि हिबा यांच्या प्रेमकथेचे सार या चित्रपटात दडलेले आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha